शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'राज'सभेचा मनसे जिल्हाध्यक्षांना मोठा फटका; चोरट्यांनी पळविली दहा लाखांची सोनसाखळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 17:24 IST

गर्दीत चोरट्यांनी गळ्यातील २०० ग्रॅमची सोनसाखळी चोरली.

औरंगाबाद : मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी आयोजित राज ठाकरे यांच्या सभेला उपस्थित असलेल्या मनसेच्या नांदेड जिल्हाध्यक्षाची दहा लाखांची सोनसाखळी चोरट्यांनी पळविल्याचे समोर आले. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

पोलिसांनी सांगितले की, नांदेड येथील मनसेचे पदाधिकारी मनिंदरसिंग उर्फ माँटीसिंग धरमसिंग जहागीरदार हे १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांच्या सभेसाठी आले होते. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २०० ग्रॅमची सोनसाखळी चोरली. काहीवेळानंतर माँटीसिंग यांच्या हे निदर्शनास आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदविली.

पाकीटमारीच्या हिस्स्यावरून भोसकलेराज ठाकरे यांच्या सभेत जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे पाकीट मारल्यानंतर पैशांच्या वाटणीवरून अल्पवयीन साथीदाराच्या पोटात चाकू भोसकणारे जुबेर खान जफर खान (२१) आणि अकबर खान रऊफ खान (४६, दोघे रा. बायजीपुरा) या दोघांना ६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्या. ए. एन. माने यांनी सोमवारी दिले. याबाबत जखमीचा नातलग इमरान खान आरेफ खान याने फिर्याद दिली. जुबेर आणि अकबर हे इमरानचे चुलत भाऊ आहेत. ही मंडळी घरच्या महिलांसह भीक मागून उदरनिर्वाह चालवितात. पैसे पुरत नसल्याने रिक्षा चालक समीर महेबूब पठाण याच्या साथीने पाकीटमारी करतात. १ मे रोजी सायंकाळी त्यांनी काही व्यक्तींची पाकिटे मारली. आलेल्या पैशातून त्यांनी बुढीलेन येथील हॉटेलात जेवण केले. मग १४ वर्षीय साथीदाराने अकबरला हिस्सा मागितला. त्यावर दोघांनी त्याला मारहाण केली. जुबेरने त्याच्या पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केले. नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीMNSमनसे