तरुणच ठरविणार आमदार
By Admin | Updated: October 1, 2014 00:37 IST2014-10-01T00:37:22+5:302014-10-01T00:37:22+5:30
गजेंद्र देशमुख , जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघांत मातब्बर पुढाऱ्यांमुळे प्रचारात रंगत आली आहे. पारंपरिक मतदारांसोबतच खऱ्या अर्थाने आपला आमदार कोण असावा

तरुणच ठरविणार आमदार
गजेंद्र देशमुख , जालना
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघांत मातब्बर पुढाऱ्यांमुळे प्रचारात रंगत आली आहे. पारंपरिक मतदारांसोबतच खऱ्या अर्थाने आपला आमदार कोण असावा हे आता तरुणच ठरविणार असल्याचे आकडेवारी स्पष्ट होते. तरुणांचा कौल महत्वाची भूमिका बजावणार आहे. जिल्ह्यात ३० ते ३९ या वयोगटांत तब्बल ३ लाख ९२ हजार ९७७ मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार ५,६४७ मतदार आहेत.
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी छाननी प्रक्रियेअंती एकूण १७७ उमेदवारांपैकी ४१ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे आता १३६ उमेदवार निवडणूक रिंंगणातत आहे.
विविध पक्षांच्या मात्तबर तसेच अपक्ष उमेदवारांनी आपल्या जातीपातीच्या गणितासह पारंपरिक मतदारांवर आपली व्यूहरचना आखल्याचे दिसून येते. गणित जुळविली जात आहेत. असे असे असले तरी गत काही वर्षांत मतदान करण्याविषयी झालेली जागृती व मतदानाची वाढलेली टक्केवारी यामुळे तरुणांचे मतदान कोणत्या उमेदवाराकडे झुकते, यावरच भवितव्य अवलंबून असणार आहे.
काही वर्षांपर्यंत जात, पात, धर्म यावर अधारित मतदानाची मोठी आघाडी होती. आता हे सर्व चित्र बदलत आहे. मतदान व्यक्तीकेंद्रीत झाले आहे. पारंपरिक मतदानाला बऱ्याच अंशी तडा गेला आहे. १८ ते ९९ वयोगटांत १३ लाख ७१ हजार ५९१ मतदरांची नोंद असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.यात प्रामुख्याने १८ ते १९ गटांत २५ हजार ८४७, २० ते २४ वयोगटांत १ लाख ५३ हजार ३४४, २५ ते २९ १ लाख ४६ हजार ८७४ तर ३० ते ३९ वयोगटांत ३९२९७७ मतदार आहेत. तर ९० ते ९९ वयोटांत ५६४७ मतदार आहेत.
तरुण म्हणतात, विकासाला मत
आज रोजी मतदान हे व्यक्तिकेंद्री झाले आहे. जो व्यक्ती मतदार संघाचा विकास करेल, अथवा करु शकते त्याच उमेदवारास तरुणांची पसंती आहे.
अनेक तरुणांनी हे कबूलपण केले. जात अथवा धर्मापेक्षा विकास महत्वाचा आहे. हे तरुणांनी ठासून सांगितले. त्यामुळे जो करेल काम त्याला जनता मत देईल.