एमआयटीच्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट व्यवस्थापनाचा यशमंत्र!

By Admin | Updated: August 28, 2014 00:24 IST2014-08-28T00:18:19+5:302014-08-28T00:24:21+5:30

औरंगाबाद : एमआयटी स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना बुधवारी लोकमत मीडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय सहसंचालक आणि संपादकीय प्रमुख ऋषी दर्डा यांनी मीडियातील कॉर्पोरेट व्यवस्थापनाचा यशमंत्र दिला.

MIT students' corporate management skills! | एमआयटीच्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट व्यवस्थापनाचा यशमंत्र!

एमआयटीच्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट व्यवस्थापनाचा यशमंत्र!

औरंगाबाद : एमआयटी स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना बुधवारी लोकमत मीडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय सहसंचालक आणि संपादकीय प्रमुख ऋषी दर्डा यांनी मीडियातील कॉर्पोरेट व्यवस्थापनाचा यशमंत्र दिला. ‘कॉर्पोरेट मॅनेजमेंट’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
प्रारंभी, प्राचार्य डॉ. संतोष भोसले यांनी ऋषी दर्डा यांचे स्वागत केले. संचालक डॉ. जी.जी. सहा यांनी प्रस्तावना केली.
नेतृत्व, प्रामाणिकपणा, कल्पकता, जागृती आणि व्यवसायाशी असलेले दीर्घकालीन नाते या पाच खांबांवरच कॉर्पोरेट व्यवस्थापनाच्या यशाचा डोलारा उभा असल्याचे ऋषी दर्डा यांनी स्पष्ट केले. व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना मीडियातील करिअरच्या काय संधी आहेत? फ्रेशरर्सना प्रशिक्षणाच्या कुठल्या संधी आहेत, हे सांगतानाच त्यांनी व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य असायला हवे, यावर विशेष भर दिला. ‘लोकमत’च्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमाची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मीडियातील व्यवस्थापनाविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी यावेळी उत्तरे दिली.
विद्यापीठाच्या परीक्षेत पाचवा क्रमांक मिळविणारी एचआरची विद्यार्थिनी अश्विनी गरड हिचा ऋषी दर्डा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. लीना कोट्स, प्रा. दिव्या शर्मा यांची उपस्थिती होती.

Web Title: MIT students' corporate management skills!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.