‘तो’ बेपत्ता विद्यार्थी चाकणमध्ये सापडला

By Admin | Updated: January 17, 2017 23:11 IST2017-01-17T23:09:16+5:302017-01-17T23:11:39+5:30

पारध : येथील आश्रम शाळेत इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी एक जानेवारी रोजी बेपत्ता झाला होता.

The missing student was found in Chakan | ‘तो’ बेपत्ता विद्यार्थी चाकणमध्ये सापडला

‘तो’ बेपत्ता विद्यार्थी चाकणमध्ये सापडला

पारध : येथील आश्रम शाळेत इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी एक जानेवारी रोजी बेपत्ता झाला होता. सोळा दिवसांच्या शोध कार्यानंतर तो पुणे जिल्ह्यातील चाकण येथे सोमवारी सुखरूप सापडला. हर्षल पंढरी शेवते असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या संदर्भात पारध पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. १ जानेवारी रोजी कोणालाही न सांगता आश्रमशाळेतून हर्षल अचानक गायब झाल्याचे शिक्षकांच्या लक्षात आल्याने शाळेत एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासून शिक्षकांनी हर्षलचा ठिकठिकाणी शोध घेतला. अखेर तो चाकणमध्ये आढळून आला.

Web Title: The missing student was found in Chakan