बेपत्ता क्रीडाधिकारी प्रकटले

By Admin | Updated: February 19, 2016 00:36 IST2016-02-19T00:23:06+5:302016-02-19T00:36:53+5:30

लातूर : वरिष्ठांना कसलीही माहिती न देता गायब झालेले क्रीडाधिकारी दहा दिवसांनंतर कार्यालयात अवतरले आहेत.

The missing sportsman revealed | बेपत्ता क्रीडाधिकारी प्रकटले

बेपत्ता क्रीडाधिकारी प्रकटले




लातूर : वरिष्ठांना कसलीही माहिती न देता गायब झालेले क्रीडाधिकारी दहा दिवसांनंतर कार्यालयात अवतरले आहेत. विशेष म्हणजे या कार्यालयात
ना कुणाचा धाक ना भिती. त्यामुळेच क्रीडाधिकारी कोणालाही न सांगता गैरहजर राहिल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात होती.
याप्रकरणी रविकिरण डिगोळे यांनी १४ फेबु्रवारी रोजी जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना बेपत्ता झालेल्या सोमदत्त देशपांडे यांच्या रजेविषयी लेखी माहिती मागविली होती़ त्यात जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी १५ फेब्रुवारी रोजी सदर अधिकारी ३ फेबु्रवारी रोजी औरंगाबाद येथे मिटींगला गेले होते़ त्यानंतर ४ फेबु्रवारीपासून त्यांची लेखी व तोंडी रजा नसल्याचे डिगोळे यांना लेखी कळविले आहे़ शासनाचे जावई असलेले हे अधिकारी कार्यालयात नसल्याने अनेक क्रीडाविषयक कामे खोळंबली होती़ अधिकाऱ्यांच्या अहवालामुळे सोमदत्त अवतरले आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: The missing sportsman revealed