गायब झालेले संगणक संच परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 00:33 IST2016-07-22T00:22:09+5:302016-07-22T00:33:57+5:30
केदारखेडा : येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेतील गायब असलेले दोन्ही संगणक संच परत मिळाले आहेत. परंतु आता या शाळेच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे़

गायब झालेले संगणक संच परतले
केदारखेडा : येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेतील गायब असलेले दोन्ही संगणक संच परत मिळाले आहेत. परंतु आता या शाळेच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे़
याबाबत लोकमतने मंगळवारी संगणक शिक्षण कागदावरच या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ त्यावर गावातील शालेय समिती सदस्यांसह ग्रामस्थ जागे झाले़ त्यांनी सदरील शाळेत तपासणीसाठी गेले असता संगणक खोलीला कुलूप लावलेले दिसून आले़
संतप्त ग्रामस्थांनी या संगणक खोलीचे कुलूप तोडले खरे, मात्र सर्वशिक्षा अभियान अंतर्गत आलेल्या सहा संगणक संचापैकी दोन संच गायब असल्याचे तर चारची दुरवस्था झाल्याचे दिसले. यावर लोकमतने पुन्हा बुधवारी त्या संगणक खोलीचे संतप्त ग्रामस्थांनी तोडले कुलूप, सहा पैकी दोन संगणक गायब तर चार धुळखात पडून’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे गायब झालेले दोन संगणक संच गुरूवारी शाळेत परत आहे. बिघाड झालेले संगणक तात्काळ सुधारण्याची मागणी होत असून, बेजबाबदार शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी शालेय समिती सदस्यांसह ग्रामस्थांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)