केंद्र व राज्य शासनाकडून जनतेची दिशाभूल

By Admin | Updated: December 28, 2015 00:19 IST2015-12-28T00:12:49+5:302015-12-28T00:19:44+5:30

लातूर : राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप, शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा या सरकारला विसर पडला आहे़

Misleading of the public by the central and the state government | केंद्र व राज्य शासनाकडून जनतेची दिशाभूल

केंद्र व राज्य शासनाकडून जनतेची दिशाभूल


लातूर : राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप, शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा या सरकारला विसर पडला आहे़ त्यांनी कोणतीही आश्वासने पाळली नाहीत़ ही जनतेची दिशाभूल आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले़
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या २१ व्या राज्य अधिवेशनाला रविवारी अहमदपुरातील चामे गार्डन येथे प्रारंभ झाला़ या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर बोलत होते़ अध्यक्षस्थानी किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस अतुलकुमार अंजान होते़ यावेळी माजीमंत्री बाळासाहेब जाधव, माजी आ़बाबासाहेब पाटील, शिवानंद हेंगणे, बाळासाहेब पाटील टाकळगावकर, निवृत्ती कांबळे, सिराजोद्दीन जहागिरदार, अ‍ॅड़ भगवानराव पौळ, माजी सभापती गुरुडे, ओमकार पाटील, बाबुराव कानगुले यांची उपस्थिती होती़ यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सरकारमध्ये सहभागी आहेत़ पण ते सरकारवर टीका करतात़ भाजपचे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करत नसल्याचे ते सांगतात़ सरकारने काहीच केले नाही, असे त्यांचे मत असेल तर ते आपल्या मंत्र्यांना राजीनामा देण्यास का सांगत नाहीत, असा सवालही अ‍ॅड़ आंबेडकर यांनी केला़ भाजप व सेनेची मिलीभगत असून, ते एकमेकांवर आरोप करुन जनतेला फसवत आहेत़ उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचा खरच कळवळा असेल तर आणि भाजपचे सरकार काही करत नसेल तर ते सरकारमधून का बाहेर पडत नाहीत, असेही अ‍ॅड़ आंबेडकर म्हणाले़
प्रास्ताविक कॉ़महादेव गावंडे यांनी केले़ माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांचेही समयोचित भाषण झाले़ सुत्रसंचालन गुणाले यांनी तर आभार राजीव पाटील यांनी मानले़ परिषदेला शेतकरी उपस्थित होते़

Web Title: Misleading of the public by the central and the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.