बनावट कागदपत्राद्वारे शासनाची दिशाभूल
By Admin | Updated: March 4, 2016 23:27 IST2016-03-04T23:23:17+5:302016-03-04T23:27:42+5:30
नवीन नांदेड : नोंदणीकृत फार्मासिस्ट म्हणून पूर्णवेळ काम करीत असल्याचे खोटे कागदपत्र व शपथपत्र कार्यालयात सादर करून शासनाची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून अखेर दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्राद्वारे शासनाची दिशाभूल
नवीन नांदेड : नोंदणीकृत फार्मासिस्ट म्हणून पूर्णवेळ काम करीत असल्याचे खोटे कागदपत्र व शपथपत्र कार्यालयात सादर करून शासनाची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून अखेर दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, नांदेड येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक नामदेवराव भालेराव यांनी ४ मार्च रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. औषध निरीक्षक भालेराव यांच्या तक्रारीनुसार असर्जन येथील संदीप रावसाहेब देशमुख तसेच क्षितिजा पंडितराव देशमुख यांनी १६ डिसेंबर २०१० ते ५ डिसेंबर २०१२ या कालावधीत कृष्णाई मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स (जयप्रकाश नगर, असर्जन) येथे फार्मासिस्ट म्हणून पूर्णवेळ काम करणार असल्याचे खोटे तथा बनावट कागदपत्र कार्यालयात सादर केले.