शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखोंचा अपहार; याचिकाकर्त्यांना खंडपीठाचा तूर्तास दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:27 IST

या प्रकरणी पुढील सुनावणी १० जुलै रोजी होणार आहे

छत्रपती संभाजीनगर : शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या, संस्थेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरुद्ध तूर्तास कुठलीही सक्तीची कारवाई करू नये, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दिले.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे न ऐकताच संस्थानने अपहाराच्या रकमेच्या वसुलीसाठी, बजावलेल्या नोटिसांच्या अनुषंगाने न्या. नितीन डब्ल्यू. सांबरे आणि न्या. सचिन एस. देशमुख यांनी हे आदेश दिले. याचिकाकर्त्यांनी मागणी केलेली कागदपत्रे त्यांना उपलब्ध करून देता येतील काय, याचा विचार करण्याचे खंडपीठाने संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. १० जुलैला पुढील सुनावणी होईल.

प्रकरणाची पार्श्वभूमीनिवृत्त कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, रवी घुले आणि इतरांनी याचिकेत म्हटल्यानुसार काही दिवसांपूर्वी विद्युत विभागातील एक कर्मचारी संशयितरीत्या संस्थानची विद्युत उपकरणे बाहेर नेताना आढळला. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. प्रथम चौकशीमध्ये अपहाराची रक्कम ८३ लाखांच्या आसपास असल्याचे निदर्शनास आले. म्हणून, २०१७ ते २०२२ दरम्यानचे विद्युत विभागाच्या लेखा परीक्षणाचे आदेश त्यांनी दिले. त्यात एका कर्मचाऱ्याला दोषी ठरवून व त्याच्यावर ७७ लाखांच्या अपहाराचा आरोप ठेवून, फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित केले.

रक्कम जमा करण्याचे आदेशत्यानंतर अपहाराच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम २०१७ ते २०२२ या कालावधीतील विद्युत विभागात सेवा बजावलेले कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता व इतर पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. कार्यरत आणि निवृत्त अधिकाऱ्यांनी ५० हजार ते साडेतीन लाख रुपये ३० दिवसांत जमा करावेत. अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत नोटिसा बजावल्या.

नैसर्गिक न्याय तत्त्वांचा भंगम्हणून त्यांंनी ॲड. अविनाश खेडकर यांच्यामार्फत याचिका दाखल केल्या. याचिकाकर्त्यांना बाजू मांडण्याची संधी व कागदपत्रे न देता थेट वसुलीची रक्कम निश्चित करून पैसे जमा करण्याचे दिलेले आदेश बेकायदेशीर आणि नैसर्गिक न्याय तत्त्वाच्या विरुद्ध असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. त्यांना ॲड. विराज येलमामे यांंनी सहकार्य केले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठshirdiशिर्डी