चित्रकलेच्या आरशात समाज जीवनाचे प्रतिबिंब!
By Admin | Updated: September 5, 2014 00:53 IST2014-09-05T00:28:04+5:302014-09-05T00:53:56+5:30
जालना : गणेशोत्सव व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्या मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त बडीसडकवर चित्रकला प्रदर्शन सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात हस्तकला लोप पावत चालली आहे.

चित्रकलेच्या आरशात समाज जीवनाचे प्रतिबिंब!
जालना : गणेशोत्सव व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्या मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त बडीसडकवर चित्रकला प्रदर्शन सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात हस्तकला लोप पावत चालली आहे. परंतु पारंपरिक ठेवा जोपासता यावा म्हणून ग्रामीण भागातील दहीपुरी येथील कलाशिक्षकाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शन भरविले आहे.
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला कलाशिक्षक दिनेश ठाकूर हे ग्रामीण भागातील कलावंत घडविताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले. शाळेतील मुलांना पेन्सीलसुध्दा निट धरता येत नव्हती. कलेची जाण नव्हती. मी जेव्हा त्यांना एखादे चित्र काढण्यास सांगायचो तेव्हा विद्यार्थी माझ्यापासून दूर जात. प्रतिसाद देत नसे. सततच्या पाठपुराव्यानंतर आज दहीपुरी सारख्या छोट्या खेड्यातील विद्यार्थ्यांचे कला प्रदर्शन भरले, ही अभिमानाची बाब आहे. वेळप्रसंगी पदरमोड करुन मी त्यांना साहित्य पुरविले. आता प्रदर्शन भरवले व यातून सुध्दा चांगले कलाकार निवडून दोन वर्षांपासून जिल्हास्तरावर प्रदर्शन भरविण्याची तयारी विद्यार्थ्यांकडून करीत आहे. संस्था अध्यक्ष अमोल खरात यांनीही प्रतिसाद दिला.
ग्रामीण भागातील सामाजिक परिस्थिती, भौतिक परिस्थितीत विद्यार्थी काही फारसे करु शकत नाही किंवा शिक्षकही परिस्थितीमुळे हतबल असतात. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दहशतवाद, शेतकऱ्यांची आत्महत्या आदी विषयांवर शेकडो सुंदर चित्रे रेखाटली आहेत. ग्रामीण जीवनशैली तसेच काही प्रसंगचित्रे रेखाटली आहेत. थोडक्यात ग्रामीण भागातील प्रसंगचित्र चित्रित करुन जाती धर्मात सलोखा कसा निर्माण करता येईल याचे चित्रण केले आहे व शाहरी भागातील समाज जीवन कसे असते याचे वास्तविक चित्रण या कलेतून दिसून येते. ग्रामीण भागात राहणारे परंतू शहर व जागतिक प्रसंगाचे वर्णन चित्राच्या माध्यमातून केले. गणेशोत्सवानिमित्त सदरील प्रदर्शन विनामूल्य ठेवण्यात आले. सदरील प्रदर्शन मात्र त्यांना व त्यांच्या चित्रांना न्याय मिळण्याची गरज असल्याची अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली. सदरील चित्र रेखाटण व रंगकाम करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे अविनाश खेडकर, सुमित टापरे, संदीप भोयटे, किशोर जाधव, विनोद खेडकर, अभिजित रांजणे, योगेश साळुंके, किशोर मोरे, गोपाल केसकर, गणेश रांजणे, दास निर्मळ, भगवानमुळे, अर्चना सपकाळ, निकीता सातपुते, योगेश मोरे, सचिन साळुंके, सोमनाथ गोडसे, मोनिका भोईटे, अश्विनी सपकाळ यांनी हे चित्र काढले आहे.