दुर्गास्थापनेसाठी जल्लोषात मिरवणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:31 IST2017-09-22T00:31:29+5:302017-09-22T00:31:29+5:30

येथे घटस्थापनेसह दुर्गा स्थापनेसाठी सकाळपासूनच बाजारपेठ सजली होती. दुपारनंतर विविध मंडळांनी दुर्गादेवीची मूर्ती मिरवणूक काढून नेत स्थापनास्थळी नेल्याचे चित्र दिसत होते.

Miravanka in the city of Durgaon | दुर्गास्थापनेसाठी जल्लोषात मिरवणुका

दुर्गास्थापनेसाठी जल्लोषात मिरवणुका

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथे घटस्थापनेसह दुर्गा स्थापनेसाठी सकाळपासूनच बाजारपेठ सजली होती. दुपारनंतर विविध मंडळांनी दुर्गादेवीची मूर्ती मिरवणूक काढून नेत स्थापनास्थळी नेल्याचे चित्र दिसत होते.
शहरातील गांधी चौक भागात घटस्थापनेसाठी विविध प्रकारचे साहित्य विक्रीस आले होते. त्या ठिकाणी ग्रामीण भागातील विक्रेते मोठ्या संख्येने आले होते. दुपारनंतर दुर्गा मातेच्या काढलेल्या मिरवणुकीत युवकांसह महिलांचाही सहभाग विविध ठिकाणी पहायला मिळत होता. विविध आकारातील मूर्ती घेवून जाताना बॅण्ड पथक व काहींनी डीजेच्या तालावर ठेकाही धरला होता. शहरातील प्रमुख दुर्गा मंडळांनी आकर्षक देखावेही उभारले आहेत. दुपारनंतर पावसामुळे काही मिरवणुकांत व्यत्ययही आला होता. दंत महाविद्यालयात विद्यार्थिनींनी आकर्षक वेशभूषा करून लेझीमद्वारे दुर्गा मातेचे स्वागत केले.

Web Title: Miravanka in the city of Durgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.