मीरा पाऊसकर निधन प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:04 IST2021-05-15T04:04:12+5:302021-05-15T04:04:12+5:30
अभिमानाने सांगतो की, माझ्या गुरू मीरा पाऊसकर या आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या माझ्यासारख्या गरीब मुला- मुलींना त्यांनी भरतनाट्यमचे मोफत ...

मीरा पाऊसकर निधन प्रतिक्रिया
अभिमानाने सांगतो की, माझ्या गुरू मीरा पाऊसकर या आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या माझ्यासारख्या गरीब मुला- मुलींना त्यांनी भरतनाट्यमचे मोफत शिक्षण दिले. कार्यक्रमाचे नियोजन व सादरीकरण कसे करायचे ते मी पाऊसकर मॅडमकडून शिकलो. त्या विद्यार्थ्यांना भरतनाट्यम यावे म्हणून अपार परिश्रम करत असत.
दिलीप खंडेराय
लोक नृत्य अभ्यासक
----
माझ्या शिष्याचे पालक म्हणून त्यांची ओळख
मीरा पाऊसकर यांची मुलगी अनुराधाही माझ्याकडे कथ्थक, ओडिसी शिकण्यासाठी येत असे. मीरा पाऊसकर या स्वतः त्यांच्या मुलीला माझ्याकडे कथ्थक शिकविण्यासाठी घेऊन आल्या होत्या. गोड भाषी, सरळ हृदयी त्यांचा स्वभाव होता. त्या एवढ्या महान कलाकार आहे त्याचा त्यांना गर्व नव्हता. भरतनाट्यमप्रति त्यांची श्रद्धा व समर्पणभाव वाखाणण्याजोगा होता. मात्र, माझी त्यांची ओळख माझ्या शिष्याचे पालक म्हणून झाली. मात्र, त्यांची तब्येत नाजूक असल्याने त्या नंतर आजारीच असत यामुळे त्यांच्या शिष्यांच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला नाही.
पार्वती दत्ता
एमजीएम महागामी संचालिका
----
मराठवाड्यात भरतनाट्यम रुजविले
मीरा पाऊसकर जेव्हा ७० च्या दशकात औरंगाबादमध्ये आल्या व भरतनाट्यम शिकविणे सुरू केले तेव्हा त्यांना सुरुवातीला खूप त्रास झाला. त्या घरोघरी जाऊन मुलींना नृत्य शिकवा असे त्यांना सांगावे लागत. त्यांच्यामुळेच दक्षिणेतील भरतनाट्यम मराठवाड्यात रुजले. त्या स्वतः शिकवत असतानाही त्यांनी त्यांच्याकडील अनेक शिष्यांना माझ्याकडे कुचिपुडी शिकविण्यासाठी पाठवले. हे महान कलाकाराचे लक्षण होय.
व्ही. सौम्यश्री
संचालिका, देवमुद्रा मूव्हमेंट स्कुल
----
भरतनाट्यम शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांपैकी मी एक
अजूनही मुलं भरतनाट्यम शिकण्यासाठी पुढे येत नाहीत. पाऊसकर यांच्याकडे शेकडो मुली भरतनाट्यम शिकल्या पण मुलांमध्ये दिलीप खंडेराय व मी आम्ही दोघेच होतो. आज मी जे काही आहे ते माझ्या गुरू मीरा पाऊसकर यांच्या मुळेच.
भरतनाट्यममध्ये अभिनय शिकवण्यात त्यांच्या हातखंडा होता. त्या जे अभिनय करून शिकवत ती भावमुद्रा विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहात होती.
पाऊसकर मॅडम सामाजिक विषयांवरील गाणे लिहीत होत्या.
विक्रांत वायकोस
शिष्य