शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
4
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
5
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
6
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
7
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
8
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
9
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
10
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
11
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
12
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
13
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
14
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
15
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
16
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
17
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
18
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
19
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
20
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आरटीई प्रवेश देऊ शकत नाहीत - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 12:41 IST

अहमदनगरमधील दोन अल्पसंख्याक स्वयं-वित्त तत्त्वावर संचालित इंग्रजी माध्यमाच्या शाळांना २०१९-२०२० पर्यंत आरटीई कायद्यानुसार २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची परवानगी होती.

- डॉ. खुशालचंद बाहेतीछत्रपती संभाजीनगर : अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ (आरटीई कायदा) अंतर्गत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित मुलांसाठी २५ टक्के कोट्यानुसार स्वेच्छेने देखील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

अहमदनगरमधील दोन अल्पसंख्याक स्वयं-वित्त तत्त्वावर संचालित इंग्रजी माध्यमाच्या शाळांना २०१९-२०२० पर्यंत आरटीई कायद्यानुसार २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची परवानगी होती. १३ फेब्रुवारी २०२० रोजी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना कळविले की, १५ मार्च २०१३ च्या शासन निर्णयानुसार त्यांच्या शाळा आरटीई पोर्टलवरून काढून टाकल्या जात आहेत.

याला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. अल्पसंख्याक संस्थांना आरटीई कायद्यानुसार २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सक्ती करता येणार नाही. तथापि, त्यांनी स्वेच्छेने प्रवेश दिला तर  त्यांना परवानगी न देणे घटनाबाह्य ठरेल, अशी त्यांची भूमिका होती. हायकोर्टाने हा युक्तिवाद नाकारला. हायकोर्ट म्हणाले की, अशा प्रवेशांना परवानगी देणे अल्पसंख्याक संस्थांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करेल. ज्यामुळे त्यांना आरटीई कायद्याच्या आदेशातून  सूट देतात.

 न्यायमूर्ती मंगेश एस. पाटील आणि शैलेश पी. ब्रह्मे यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाने आरटीई कायद्याने घटनेच्या कलम ३० (१) नुसार हमी दिलेल्या अल्पसंख्याक संस्थांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन ठरविले आहे.  त्यामुळे हायकोर्ट अल्पसंख्याक संस्थांना आरटीई कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहण्याची परवानगी देऊ शकत नाही. संस्था स्वत: होऊन तयार असली तरी त्यांना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने प्रमती एज्युकेशनल ॲण्ड कल्चरल ट्रस्ट प्रकरणात मनाई केली आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा