अल्पवयीन युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:03 IST2017-08-14T00:03:55+5:302017-08-14T00:03:55+5:30

१८ वर्षीय युवक व १४ वर्षीय विद्यार्थिनींचे प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमाला कुटुंबातून विरोध झाल्याने या प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला

Minor teen suicide attempt | अल्पवयीन युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

अल्पवयीन युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय युवक व १४ वर्षीय विद्यार्थिनींचे प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमाला कुटुंबातून विरोध झाल्याने या प्रेमी युगुलाने शनिवारी दुपारी पळ काढला. ते दोघे त्या गावच्या परिसरातील उसाच्या शेतात गेले. तिथे या दोघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी दोघेही शुद्धीत आल्यास भ्रमणध्वनीद्वारे ग्रामस्थांना माहिती दिली व या प्रेमी युगुलाचे रहस्य उघडकीस आले. या दोघांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरु असून दोघांचीही प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे.
तालुक्यातील एका गावातील महेश (१८, नाव बदललेले) या युवकाचे गावातीलच १४ वर्षीय शालेय विद्यार्थिनीशी प्रेम संबंध जुळले. याची चर्चा गावात सुरू झाली. प्रेम संबंधाला गावातून व कुटुंबातून विरोध होतो की काय या उद्देशाने शनिवारी दुपारी प्रेयसीची शाळा सुटल्यानंतर प्रियकर तिला घेवून ऊसाच्या शेताकडे गेला.
या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात कसलीही नोंद झाली नव्हती. मात्र, सहाय्यक पोलिस निरिक्षक विसपुते यांनी घटनेला दुजोरा दिला.

Web Title: Minor teen suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.