काकाचा मित्रासह अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार
By Admin | Updated: June 25, 2016 00:41 IST2016-06-25T00:18:51+5:302016-06-25T00:41:29+5:30
औरंगाबाद : वेगवेगळी कारणे सांगून १६ वर्षीय महाविद्यालयीन युवतीला नारेगाव येथे नेऊन तिच्या मावशीचा पती आणि त्याच्या

काकाचा मित्रासह अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार
औरंगाबाद : वेगवेगळी कारणे सांगून १६ वर्षीय महाविद्यालयीन युवतीला नारेगाव येथे नेऊन तिच्या मावशीचा पती आणि त्याच्या मित्रानेच वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. विशेष म्हणजे आरोपीने तिला ब्ल्यू फिल्म दाखवून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही नराधमांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून एमआयडीसी सिडको पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
अड्डू ऊर्फ सय्यद इम्रान सय्यद अश्फाक (२७, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) आणि शेख अझरुद्दीन खैरोद्दीन (३१, रा. अजीज कॉलनी, नारेगाव) अशी अटक केलेल्या नराधमांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील शंभूनगर येथील पीडितेचा अड्डू ऊर्फ इम्रान हा मावशीचा पती (काका) आहे. पीडिता बारावीमध्ये शिकते. पीडितेचे वडील रिक्षा चालवतात तर आई शिवणकाम करून घरासाठी हातभार लावते. काका या नात्याने इम्रानचे पीडितेच्या घरी येणे-जाणे असायचे. तिचे वडील सकाळीच रिक्षा घेऊन कामावर निघून जायचे. आईसोबत पीडिता मार्च महिन्यात घरी असताना इम्रान तेथे गेला. पीडितेला बारावीची पुस्तके घेऊन देतो, असे सांगून तिला घेऊन गेला. त्यानंतर पुस्तके घेण्याऐवजी तो तिला नारेगाव येथील अजीज कॉलनीमध्ये राहणारा त्याचा मित्र शेख अझरुद्दीन याच्या घरी घेऊन गेला. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील दोन खोल्याच्या घरात अझहर तेथे उपस्थित होता. इम्रानने त्यास घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिला ब्ल्यू फिल्म दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने घरी दुचाकीवर घेऊन जाताना तिला पुस्तके घेऊन दिली आणि हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवे मारून टाकीन, अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे पीडिता गप्प राहिली.