अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ८ महिन्यानंतर दिली तक्रार
By Admin | Updated: July 9, 2014 00:07 IST2014-07-08T23:43:27+5:302014-07-09T00:07:17+5:30
हिंगोली : तालुक्यातील खानापूर चित्ता येथे एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ८ महिन्यापूर्वी घडली. परंतु आई-वडिलास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ८ महिन्यानंतर दिली तक्रार
हिंगोली : तालुक्यातील खानापूर चित्ता येथे एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ८ महिन्यापूर्वी घडली. परंतु आई-वडिलास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने पीडित मुलीने ८ जुलै रोजी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून आरोपी गोपाल भानुदास पवार (वय २१) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठ महिन्यांपूर्वी सदरील अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचे पाहून समोरच राहणाऱ्या गोपाल पवार याने तिच्या घरात प्रवेश केला आणि बलात्कार केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ‘या घटनेबाबत कुणाला काही सांगितल्यास तुझ्या आई-वडिलास जीवे मारून टाकेन’ अशी धमकीही त्याने दिली होती. त्यामुळे आजवर सदर मुलीने याबाबत कुठेच वाच्यता केली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, तिच्या फिर्यादीवरून आरोपी गोपाल भानुदास पवार याच्याविरूद्ध कलम ३७६ व अॅट्रासिटी कायद्यानुसार बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास हिंगोली शहरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर आडे करीत आहेत. (प्रतिनिधी)