अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोन आरोपींना अटक.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 18:15 IST2017-08-08T18:13:52+5:302017-08-08T18:15:58+5:30
दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दितील खोरी तांडा येथे आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याची फिर्याद दाखल केली होती. यावरुन दोघा आरोपींना आज अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी याच तांड्यावर राहतात.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोन आरोपींना अटक.
ऑनलाईन लोकमत
माजलगाव ( बीड ), दि. ८ : दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दितील खोरी तांडा येथे आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याची फिर्याद दाखल केली होती. यावरुन दोघा आरोपींना आज अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी याच तांड्यावर राहतात. पिडीत मुलगी अल्पवयीन व भोळसर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीचे आई वडील उस तोड कामगार आहेत. या हंगामात मार्च मध्ये ते ऊस तोडणीस जाताना मुलीस घरी ठेऊन गेले होते. या दरम्यान तांड्यावरील तुकाराम अंकुश पवार व क्रष्णा राजु पवार यांनी मुलीच्या भोळसरपणाचा गैर फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. यातून मुलगी गर्भवती राहिली. मुलीच्या आईच्या हे लक्षात आल्याने तिने तिला विचारणा केली असता मुलीने सर्व हकीकत सांगीतली. यानंतर तिने घाबरून जात तीन दिवसापूर्वी विष प्राशन केले.
पिडीतेवर झालेल्या अत्याचाराची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी पिडीतेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर पिडीतेच्या आईने दिंद्रुड पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवली. यावरून आरोपी विरोधात कलम ३७६ २(१), बाल लैंगिकता अत्याचार विरोधी कलम ४,८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास स.पो. निरीक्षक आर. एस. सानप करत आहेत.