अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: June 24, 2016 01:30 IST2016-06-24T00:36:20+5:302016-06-24T01:30:56+5:30

वडोदबाजार : फुलंब्री तालुक्यातील धनसी वस्तीवरील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ९ जणांनी बलात्कार केला. सदर मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे

Minor girl gang rape | अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार


वडोदबाजार : फुलंब्री तालुक्यातील धनसी वस्तीवरील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ९ जणांनी बलात्कार केला. सदर मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर सदर घटनेला वाचा फुटली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत सहायक पोलीस निरीक्षक नरहरी शिंदे यांनी सांगितले की, २६ जानेवारी २०१६ रोजी सदर फिर्यादी मुलगी धनसी वस्तीवरील आपल्या राहत्या घरात झोपलेली असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याच वस्तीवरील चार जण तिथे आले. त्यांनी बळजबरीने तिचे हात धरून तिला उचलून शेजारच्या शेतकरी शेख सांडू यांच्या कपाशीच्या शेतात नेले. यावेळी चारही जणांनी आळीपाळीने तिच्यावर अतिप्रसंग केला. घटनेच्या एक महिन्यानंतर गावातील इतर दोन जणांनी तिच्यावर बलात्कार केला; परंतु या घटनेची कुठेही वाच्यता झाली नाही.
यादरम्यान सदर मुलगी पाल (ता. फुलंब्री) येथे आपल्या मावशीकडे गेलेली असताना त्या ठिकाणी एकाने तिच्यावर अतिप्रसंग केला. सदर मुलीने झालेली हकीकत आपल्या मावशीला सांगितल्यानंतर त्याला गावातच मारहाण करण्यात आल्याने प्रकरण मिटले. त्यानंतर सदर पीडिता पुन्हा आपल्या गावी आल्यानंतर एकाने तिच्यावर बलात्कार के ला.
बुधवारी सदर मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला डॉक्टरकडे नेले असता तिला दिवस गेल्याचे उघड झाले. त्यांनी तात्काळ वडोदबाजार पोलीस ठाणे गाठून झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना सांगितली. सुरुवातीला एका आरोपीचे नाव समोर आले; परंतु पोलीस तपासात एक-एक करीत नऊ आरोपी असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी रात्रीच सात आरोपींना अटक केली, तर वासडी येथील आरोपीस गुरुवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आणखी आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त (पान २ वर)

Web Title: Minor girl gang rape