शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणमुळे कॉलेज सोडून अल्पवयीन विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरात: दामिनी पथकाच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा

By राम शिनगारे | Updated: June 4, 2023 21:29 IST

जालना येथील घटना.

छत्रपती संभाजीनगर : जालना शहराजवळील एका महाविद्यालयातील अल्पवयीन मुलास खोलीवर दोन मैत्रिणी आल्यामुळे परिसरातील पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या तिघांनीही जालना सोडून छत्रपती संभाजीनगर गाठले. शनिवारची रात्र रेल्वेस्थानक परिसरात घातली. त्यानंतर कुटुंबियांना संपर्क साधल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी दामिनी पथकाला घटनेची माहिती कळविली. दामिनी पथकाने तीन विद्यार्थ्यांना शोधुन काढून मदत केल्याचा प्रकार रविवारी घडला आहे.

जालना-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या एका शासकीय महाविद्यालयात १७ वर्षांचा मुलगा आणि दोन मुली शिक्षण घेतात. मुलगा नांदेड जिल्ह्यातील तर एक मुलगी परभणी तर दुसरी जालना जिल्ह्यातील आहेत. त्यातील एका मुलीसोबत मुलाचे प्रेमसंबंध आहेत. दुसरी मुलगी प्रेमसंबंध असलेल्या मुलीची खास मैत्रीण आहे. त्यामुळे दोघीही मुलाच्या खोलीवर येत-जात होत्या. या प्रकारामुळे परिसरातील पाच ते सहा मुलांनी मुलास तुझ्या खोलीवर मुली कशा काय येतात, असा जाब विचारून बेदम मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या तिघांनी बॅग भरून थेट छत्रपती संभाजीनगर गाठले. रेल्वेस्थानकावर रात्र काढल्यानंतर रविवारी मुलाने कुटुंबियांना फोन करून पैशाची मागणी केली. तेव्हा मुलाच्या मामाने या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षातुन दामिनी पथकास पाचारण करण्यात आले. त्यानुसार दामिनी पथकाच्या सहायक फाैजदार लता जाधव, हवालदार कल्पना जाधव आणि चालक मनिषा बनसोडे यांनी मुलांचा शोध सुरू केला.

रेल्वेस्थानक परिसर शोधुन काढल्यानंतर सापडले नाहीत. त्यानंतर माेबाईलच्या लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता, मुले सिद्धार्थ गार्डनमध्ये होते. तेथून त्यांना क्रांतचौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी त्यांना धीर देत नातेवाईकांना माहिती देण्यात आली. त्यातील एका मुलीचे नातेवाईक आले होते. उर्वरित दोघांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला असल्याची माहिती दामिनी पथकाने दिली. ही कारवाई निरीक्षक अम्रपाली तायडे, उपनिरीक्षक अनिता फासाटे यांच्या मार्गदर्शनात केली.पोलिस येताच मुली रडू लागल्या

दोन्ही मुलींना काय करावे हेच समजत नव्हते. जेव्हा पोलिसांनी त्यांना क्रांतीचौक ठाण्यात आणले. तेव्हा त्यांना काहीच सुचत नव्हते. त्या रडतच होत्या. तसेच प्रेमसंबंध असलेली मुलगी मुलास सोडण्यास तयार नव्हती. त्यामुळे हा प्रकार पाहुन दामिनी पथकासही काही काय करावे हेच सुचेना गेले होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद