राज ठाकरे यांच्या स्वागताला विमानतळावर मोजकेच कार्यकर्ते
By Admin | Updated: November 26, 2014 01:12 IST2014-11-26T01:03:31+5:302014-11-26T01:12:01+5:30
औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मंगळवारी शहरात दाखल झालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऐनवेळी त्यांचा मुक्काम सुभेदारी

राज ठाकरे यांच्या स्वागताला विमानतळावर मोजकेच कार्यकर्ते
औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मंगळवारी शहरात दाखल झालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऐनवेळी त्यांचा मुक्काम सुभेदारी विश्रामगृहावरून जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केला. दरम्यान, ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी केवळ साठ- सत्तर कार्यकर्ते उपस्थित होते.
राज ठाकरे यांचे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विमानतळावर आगमन झाले. तेथे जमलेल्या शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी काही कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या. त्यानंतर राज ठाकरे पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले. नेहमी पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठोकणारे राज यांचा सुभेदारी विश्रामगृहावर मुक्काम असल्याचे आधी जाहीर झाल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्येही समाधानाचे वातावरण होते.
कार्यकर्त्यांनी आधी नियोजन केल्याप्रमाणे सुभेदारी शासकीय विश्रामगृह बुक करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी हा मुक्काम रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २७ रोजी दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादेत येत असल्याने ठाकरे यांनी आपला मुक्काम तेथून हॉटेलमध्ये नेल्याचे कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.