शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

मंत्र्यांच्या निर्देशाने ‘नॅक’ मूल्यांकनास मुदतवाढ; प्रवेश रोखलेल्या २३३ महाविद्यालयांमध्ये होणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:09 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तब्बल २३३ महाविद्यालयांवर कारवाई केली होती.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील ज्या महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्यांकन केलेले नाही. त्या महाविद्यालयांमध्ये नवीन प्रवेश थांबविण्याचा निर्णय विद्यापीठांनी घेतला होता. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तब्बल २३३ महाविद्यालयांवर कारवाई केली होती. मात्र, राज्याचे उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २१ मे रोजी झालेल्या बैठकीत ‘नॅक’ करण्यासाठी महाविद्यालयांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे कारवाई केलेल्या महाविद्यालयांना दिलासा मिळाला आहे. या महाविद्यालयांमध्ये आता प्रवेश होतील.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्यांकन करून घेणे बंधनकारक केलेले आहे. त्यासाठी विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार ‘नॅक’ न केलेल्या महाविद्यालयातील प्रवेश रोखण्याचे आदेशही उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठांनी ‘नॅक’ मूल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २३३ महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्याचा निर्णय घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविद्यालयांवर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कारवाई करण्यात आली होती. विद्यापीठाशी संलग्न ४८४ पैकी केवळ २५१ महाविद्यालयांमध्येच प्रथम वर्षाचे प्रवेश होणार होते. मात्र, उच्च शिक्षण मंत्र्यांच्या आदेशामुळे यावर पाणी फेरले जाणार आहे.

काय दिले निर्देशराज्याचे उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची २१ मे रोजी बैठक झाली. या बैठकीत नॅक, बंगलोर यांचे मूल्यांकन व पुर्नमूल्यांकनासाठी संस्था नोंदणी पोर्टल कार्यान्वित नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितास्तव नॅक मूल्यांकन करण्यास महाविद्यालयांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. त्यानुसार सहा महिन्यांची मुदतवाढ देणारे पत्रच उच्च शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या कुलसचिवांना पाठविले आहे. त्याचा परिणाम राज्यातील विविध विद्यापीठांनी महाविद्यालयांवर कारवाईसाठी उचलेले पाऊल मागे घ्यावे लागणार आहे. त्याचा फायदा टपरीछाप महाविद्यालयांची दुकानदारी कायम राहण्यात होणार आहे.

यांना होणार फायदाडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील २३३ कॉलेजांना प्रथम वर्षास प्रवेश देण्यास मनाई केली होती. त्यात छत्रपती संभाजीनगरात जिल्ह्यातील सर्वाधिक ८७ महाविद्यालये, बीड ६४, जालना ५१ आणि धाराशिव जिल्ह्यातील ३१ कॉलेजांचा समावेश होता. आता या महाविद्यालयांना फायदा होणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादchandrakant patilचंद्रकांत पाटीलEducation Sectorशिक्षण क्षेत्र