राज्यमंत्र्यांनी साधला नंद्राबाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:47+5:302021-02-06T04:07:47+5:30
अबोल विद्यार्थ्यांबद्दल विचारणा ः अभ्यासाअंती अहवाल देण्याच्या शिक्षणाधिकार्यांना सुचना औरंगाबाद ः जिल्ह्याच्या दाैर्यावर असलेले शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू ...

राज्यमंत्र्यांनी साधला नंद्राबाद
अबोल विद्यार्थ्यांबद्दल विचारणा ः अभ्यासाअंती अहवाल देण्याच्या शिक्षणाधिकार्यांना सुचना
औरंगाबाद ः जिल्ह्याच्या दाैर्यावर असलेले शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांनी नंद्राबाद (ता.खुलताबाद) येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेला शुक्रवारी दुपारी अडीच वाजता अचानक भेट दिली. यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पाचवी ते सातवी ३३ पैकी २२ विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मात्र, विद्यार्थी कमी का बोलतात, याचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांना दिल्या.
ग्रामीण भागात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले. विद्यार्थी उपस्थितीची आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती कडू यांना जाणून घ्यायची होती. यावेळी त्यांनी सरपंच इलियास शेख, शालेय समितीच्या अध्यक्ष आरती भोले यांच्यासह शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला. १ आॅगस्टपासून गावात समुह पद्धतीने शिक्षण सुरु असल्याचे गावकरी व शिक्षकांनी त्यांना सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी जयस्वाल, गटशिक्षणाधिकारी सचिन सोळंकी, विस्तार अधिकारी विलास केवट आदीची उपस्थिती होती.
---
उत्तरावर खुश झाल्याने दिले विद्यार्थ्याला बक्षीस
सातवीचा विद्यार्थी सुमित बोडखे या विद्यार्थ्याला कडू यांनी गुरुवारी काय शिकले हे विचारले असता त्याने असे जगावे ही कविता शिकल्याचे सांगितले. त्यावर कडू यांनी त्यातून काय शिकले असे विचारल्यावर आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली. कितीही संकटे आली तर न घाबरता त्या परिस्थितीला तोंड दिले पाहीजे असे शिकल्याचे सांगितले. त्यावर खुश होऊन कडू यांनी विद्यार्थ्याला रोख बक्षीस दिले.