शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

पहिल्यांदाच नावीन्यपूर्ण योजनांवर मिनी मंत्रालय मेहरबान; जिल्हा परिषदेचा ४६ कोटींचा मूळ अर्थसंकल्प सादर

By विजय सरवदे | Updated: March 7, 2024 14:22 IST

आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर लेखा व वित्त विभागाने बुधवारी घाईगडबडीत अर्थसंकल्पाची बैठक आयोजित केली.

छत्रपती संभाजीनगर : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा चालू आर्थिक वर्षातील ३४ कोटी ४५ लाख ५ हजारांचा सुधारित, तर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ४६ कोटी २९ लाख ६० हजार रुपयांची तरतूद असलेला मूळ अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सादर केला.

आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर लेखा व वित्त विभागाने बुधवारी घाईगडबडीत अर्थसंकल्पाची बैठक आयोजित केली. त्यामुळे बरेचसे वरिष्ठ अधिकारी या अर्थसंकल्पीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. सुरुवातीला मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले.

या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच पशुसंवर्धन विभासाठी एक कोटीहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आली. त्यापाठोपाठ समाजातील शोषित, वंचित समुहासाठी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीय, दिव्यांगसाठी तसेच जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

यावेळी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आर. एम. सोळंके, कार्यकारी अभियंता आशिष चौधरी, अभिजित वीरगावकर, कृषि अधिकारी प्रकाश पाटील, पशुसंवर्धन अधिकारी सुरेखा माने यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. हरिश्चंद्र खेडकर, प्रेमसिंग घुशिंगे, अनिल राठोड, सुभाष वैद्य, संजय महांळकर व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी अर्थसंकल्पीय बैठकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कसा होणार खर्च...........मूळ अर्थसंकल्पानुसार सन २०२४-२५ मध्ये बांधकाम विभावर २ कोटी २४ लाख ३ हजार, शिक्षण विभावर २ कोटी ३९ लाख१० हजार, आरोग्यावर ५५ लाख ५ हजार, पाणीपुरवठ्यासाठी ६ कोटी ८० लाख, समाज कल्याण विभावर ९ कोटी ७३ लाख २० हजार, दिव्यांगासाठी १ कोटी १५ लाख ११ हजार, महिला व बालकल्याण १ कोटी ५५ लाख ८ हजार, कृषी ४१ लाख ५ हजार, पशुसंवर्धन १ कोटी १२ लाख, पंचायत राज कार्यक्रम ४ कोटी ९० लाख १० हजार, सिंचन १ कोटी ७५ लाख, कृषी बायोगॅस ३० लाख ७० हजार, रस्ते परिवहन ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद