शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

दूधना प्रकल्पाचे पाणी टेलपर्यंत पोहोचलेच नाही

By admin | Updated: February 17, 2016 23:16 IST

परभणी : निम्न दूधना प्रकल्पातून दूधना नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेच नाही़

परभणी : निम्न दूधना प्रकल्पातून दूधना नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेच नाही़ नोंदविलेल्या मागणीपेक्षा २ दलघमी पाणी कमी सोडल्याने परभणी तालुक्यातील १२ गावे तहानलेलीच आहेत़ यामुळे या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम राहिला आहे़ सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पातून दूधना नदीत पाणी सोडण्याची मागणी आ़ विजय भांबळे यांनी केली होती़ तसेच आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी ३ नोव्हेंबर २०१५, ३१ जानेवारी २०१६ रोजी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन दूधनाचे १० दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी केली होती़ यासंदर्भात मंत्रालय व विभागीय आयुक्तस्तरावर बैठकही झाली़ त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी दूधना नदीपात्रातून ७ दलघमी पाणी ९०० क्युसेसने चार दरवाज्यातून सोडण्यात आले़ हे पाणी नदीपात्र परिसरातील बहुतांश गावांपर्यंत पोहोचणार नाही म्हणून पुन्हा आ़ डॉ़ पाटील यांनी पाणी सोडण्याची मागणी केली़ त्यानुसार आणखी १ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले़ हे पाणी मोरेगाव, इरळद, झरीनंतर परभणी तालुक्यातमील सनपुरीपर्यंत पोहोचले़ त्यानंतर पुढे पाणी गेलेच नाही़ त्यामुळे परभणी तालुक्यातील करडगाव, हिंगला, धारणगाव, साटला, समसापूर, धार, मांगणगाव, मटकऱ्हाळा, दुर्डी, देवठाणा, पिंपळगाव टोंग, साबा या गावांपर्यंत पोहचलेच नाही़ त्यामुळे ही गावे अद्यापही तहानलेलीच आहेत़ नदीपात्रात १० दलघमी पाणी सोडले असते तर ते पाणी टेलपर्यंत पोहचले असते़ परंतु, पाणी सोडण्यातूनही राजकारण झाले आणि १० दलघमी पाणी सोडण्याऐवजी केवळ ८ दलघमी पाण्यावरच बोळवण करण्यात आली़ (जिल्हा प्रतिनिधी)