दूध उत्पादक शेतकरीही सापडले संकटात
By Admin | Updated: September 14, 2015 00:49 IST2015-09-14T00:31:22+5:302015-09-14T00:49:35+5:30
गंगाराम आढाव , जालना दुष्काळी परिस्थितीमुळे दूध संकलनावर परिणाम झालेला असतानाच मागील चार हप्त्यांपासून जिल्ह्यातील दूध व्यावसायिक शेतकऱ्यांना त्यांच्या

दूध उत्पादक शेतकरीही सापडले संकटात
गंगाराम आढाव , जालना
दुष्काळी परिस्थितीमुळे दूध संकलनावर परिणाम झालेला असतानाच मागील चार हप्त्यांपासून जिल्ह्यातील दूध व्यावसायिक शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचे पैसेच शासनाकडून मिळाले नाही. त्यामुळे पोळा सारख्या महत्त्वाच्या सणालाही शेतकऱ्यांना उसनवारी करून सण साजरा करण्याची वेळ आली.
जिल्ह्यात मागील चार वर्षापासून शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाला समोरे जावे लागत आहे. मागील तीन वर्षापासून तर अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. चारा व पाणी टंचाईवर मात करत आपले जनावरे जगवावे लागत आहेत. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे. जालना जिल्ह्यात ५३ दूध संकलन सहकारी संस्था आहेत. या संस्थेत १५०० सदस्य असलेले शेतकरी दूध विक्री करतात. या संस्थेमार्फत जिल्ह्यातून व जिल्हा बाहेरील देऊळगाव तालुका (जि. बुलडाणा) येथून दूध संकलन करण्यात येते. दरोज सुमारे १० हजार लिटर दुधाचे संकलन करण्यात येते. मागील चार हप्त्यांचे दुधाचे पैसे थकलेले आहे. पोळा सारख्या महत्वाच्या सणालाही दुधाचे हक्काचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. परिणामी दूध संकलनावर झाला.