शेतकऱ्यांना मिळाले दुधाचे पैसे

By Admin | Updated: September 16, 2015 00:30 IST2015-09-16T00:05:17+5:302015-09-16T00:30:29+5:30

गंगाराम आढाव , जालना मागील चार महिन्यांपासून जिल्ह्यातील दूध व्यवसायीक शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचे पैसेच शासनाकडून मिळाले नसल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले होते.

Milk money received by farmers | शेतकऱ्यांना मिळाले दुधाचे पैसे

शेतकऱ्यांना मिळाले दुधाचे पैसे



गंगाराम आढाव , जालना
मागील चार महिन्यांपासून जिल्ह्यातील दूध व्यवसायीक शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचे पैसेच शासनाकडून मिळाले नसल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले होते. याबाबत ‘लोकमत’ने दूध उत्पादकांच्या व्यथा वृत्त मालिकेतून मांडल्या होत्या. त्याची दखल घेऊन तीन कोटी वीस लाखांच्या प्रस्तावा पैकी दीड कोटींचा निधी दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे उपायुक्त व वित्तीय सल्लागार मुंबई यांनी तातडीने मंजूर करून दिला. हा निधी प्राप्त होताच मंगळवारी तो संबधीत दूध सहकारी संस्थांना वाटप करण्यात आला आहे.
चारा पाणी टंचाईवर मात करून शेतकरी आपले दुधत्या जनावरांचा साभांळ करून जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत आहे. मात्र त्यांना विक्री केलेल्या दुधाचे पैसेच वेळेवर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
जालना जिल्ह्यातील ४३ दुध संकलन सहकारी संस्था आणि देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) येथील दुधसहकारी संघाचे संद्स्य असलेल्या १३०० शेतकरी शासकीय दुध शीतकरण केंद्र जालना व माहोरा(ता. जाफराबाद ) येथे दूध विक्री करतात.
दररोज सुमारे १० हजार लिटर दुधाचे संकलन करण्यात येते. मात्र मागील चार हप्त्यांचे दुधाचे पैसे थकलेले होते. पोळा सारख्या महत्वाच्या सणालाही दुधाचे हक्काचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी याबाबत लोकमतकडे तक्रारी केल्या होत्या. त्या अनुशंगाने लोकमतने दुध उत्पादकांच्या व्यथा वृत्त मालिकेतून मांडल्या होत्या. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत शासनाने प्राप्त झालेल्या ३ कोटी २० लाखाच्या वाढीव निधी मागणीच्या प्रस्तावा पैकी तातडीन दीड कोटीचा निधी मंजूर केला आहे. हा निधी मिळताच मंगळवारपासून संबधीत संस्थांना निधीचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
दुष्काळात होळपळत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकमतने सुरू केलेल्या शेतकरी हेल्पलाईनमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी जाऊन शेतकऱ्यांना न्याय मिळत आहे. आमच्या दूध संघाचे चार हप्त्याचे ३५ लाख ३७ हजार रूपये थकले होते. शेतकऱ्यांना पोळा सारख्या सणालाही त्यांच्या दुधाचे पैसे मिळत नसल्याने संघाच्या दुध संकलनावरही त्याचा परिणाम झाला होता. याबाबत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा लोकमतने जाणून घेवून त्यास वाचा फोडली. शेतकऱ्यांना त्यांचे थकीत पैसे मिळाले असल्याचे जिजामाता दूध सहकारी संघाचे सचिव सखाराम कोल्हे यांनी सांगून लोकमतचे आभार मानले. तसेच बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथील महालक्ष्मी दूध सहकारी संघाचे भगवान बारगाजे यांनीही दोन हप्तचे तीन लाख रूपये मिळाले असल्याचे सांगून ‘लोकमत’चे आभार व्यक्त केले.
सप्टेंबर ते डिसेंबर २०१५ या कालावधी करीता पुनर्विनियोजना द्वारे ३ कोटी २० लाखाचे वाढीव अनुदानाची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे उपायुक्त व वित्तीय सल्लागार मुंबई यांनी तातडीने दीड कोटीचा निधी मंजूर केला आहे.तो प्राप्त झाल्याने संबधीत संस्थांना जालना येथील शासकीय दुध शीतकरण केंद्राच्या वतीने थकीत संस्थाना धनादेशाद्वारे निधी वाटप करण्यास सुरूवात केली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी तथा विस्तार अधिकारी
ए.एन. प्रधान यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वरीष्ठ कार्यालयाकडून दीड कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी मिळाल्याने तसेच संबधीत दूध उत्पादक सहाकारी संस्थाना तातडीने धनादेश वाटप करण्यात येत आहे. मंगळवारी दिवसभरात ६७ लाखाचे धनादेश वाटप करण्यात आले असल्याचे जालना येथील शासकीय दूध शितकरण केंद्राचे व्यवस्थापक एस.एस. सिनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Milk money received by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.