शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून राज ठाकरेंवर सौम्य कलमे; इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:53 IST

या कलमात लगेच जामीन मिळतो, पुढील काळात राजकारणात राज ठाकरेंची गरज पडेल म्हणून घेतला निर्णय

औरंगाबाद : दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर दाखल केलेली गुन्हे सौम्य कलमांखाली आहेत. राणा दाम्पत्यांवर केवळ हनुमान चालीसा पठण करणार म्हणून देशद्रोहाचा गुन्हा तर राज ठाकरेंवर का नाही ? राज ठाकरे मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्यानेच गृहविभागाच्या आदेशाने सहज जामीन मिळणारी कलमे लावल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तीयाज जलील यांनी आज केला. 

राज ठाकरे यांनी १ मे रोजी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली. १६ अटींचे पालन करण्याच्या हमीवर सभेला परवानगी देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी भाषणाचा अभ्यास करून त्याचा अहवाल गृह विभागाला दिला. त्यानंतरच्या आदेशाने पोलिसांनी राज ठाकरे, सभेचे आयोजक राजू जावळेकर आणि इतरांवर भादंवि कलम ११६, ११७, १५३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अभिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कलमांवर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आता आक्षेप घेतला आहे.राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. यामुळे त्यांच्यावर १५३ -अ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र, राज ठाकरे यांच्या भाषणाचा तीन दिवस अभ्यास करून पोलिसांनी खूप सौम्य गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्याने गृह विभागाच्या आदेशाने अशी कलमे लावण्यात आली, असा आरोप खासदार जलील यांनी केला. 

राज ठाकरेंची पुढे गरज पडणार म्हणून नियम सर्वांसाठी एक आहेत. राणा दाम्पत्यांवर देशद्रोह तर हजारो लोकांसमोर प्रक्षोभक भाषण देणाऱ्या राज ठाकरेंवर सौम्य कलमे का लावली ? असा सवालही जलील यांनी गृह विभागाला केला. या दोन्ही घटनात काय वेगळे आहे याचे उत्तर सरकारने द्यावे असेही जलील म्हणाले.  सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीनंतर असा निर्णय घेण्यात आला कारण पुढील राजकारणात राज ठाकरेंची गरज पडू शकते असा अंदाज सत्ताधाऱ्यांना आहे. यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्थानिक पोलिसांचा नकार असतानाही सुरुवातीला सभेला त्याच मैदानावर परवानगी दिली, तर सभेनंतर पोलिसांच्या अहवालानंतरही साधी कलमे लावण्याचे आदेश दिल्याचा आदेशही खा. जलील यांनी केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी