शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्रीचा थरार! लूटमार करणाऱ्या चोरट्यांना पकडताना दाेन किलोमीटर धावले पोलिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 19:07 IST

वैजापुरात मध्यरात्रीचा थरार; दोघांना अटक, दोघे फरार

वैजापूर : दुचाकीस्वारांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी काही तासांत छडा लावला असून दोघांना शुक्रवारी मध्यरात्री दाेन वाजता दाेन किलोमीटर पाठलाग करून पुरणगाव रोड परिसरातील शेतातून जेरबंद केले आहे. अन्य दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. सौरभ उर्फ बाबू विकी रुझासिओ (वय १९ वर्षे, रा. ईनामवाडी, शिर्डी ता. जि. अहमदनगर) व कृष्णा प्रकाश भोळे (वय २४ वर्षे, रा. आंबेडकरनगर, सिन्नर, जि. नाशिक) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वैजापूर तालुक्यातील तिडी येथील ज्ञानेश्वर सुभाष डुकरे व त्यांचे साडू अनिल शेळके हे परसोडा येथे लग्न समारंभ आटोपल्यावर शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नींसह दोन वेगवेगळ्या दुचाकींवर घरी परतत होते. शिवराई शिवारात एका जीपच्या (एमएच २३ एडी १२१६) चालकाने त्याची जीप त्यांच्या दुचाकींच्या समोर आडवी लावली. त्यानंतर चार जणांनी त्यांना लोखंडी राॅडने व चाकूने मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम, मोबाइल व महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने असा एकूण ९० हजार ३०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. त्यानंतर डुकरे यांनी ११२ क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच पोलिस अधीक्षक मनीष कलवनिया यांनी तत्काळ स्वत: वायरलेसद्वारे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. तसेच वैजापूर उपविभागातील सर्व पोलिस ठाण्यांतर्गत पोलिसांची पथके तयार करून त्यांना संशयित वाहनाला पकडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तीन पथके तयार करण्यात आली.

दरम्यान, ही कारवाई पोलिस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवर, उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, फौजदार मनोज पाटील, रज्जाक शेख, सहायक फौजदार महादेव निकाळजे, विठ्ठल जाधव, पोलिस अमलदार योगेश झाल्टे, भगवान सिंघल, प्रशांत गिते, विजय भोटकर, वाल्मीक बनगे, गोरक्ष सदगीर, नवनाथ केरे, नवनाथ निकम, ज्ञानेश्वर पाडळे, गणेश पैठणकर, सिमा जाधव, तीन होमगार्ड यांच्या पथकाने केली.

नाकाबंदीसाठी लावलेले बॅरिकेड्स तोडून चोरटे निघाले भरधावयावेळी संशयित वाहनाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नाकाबंदीसाठी लावलेले बॅरिकेड्स तोडून भरधाव वेगाने येवला रोड रोडच्या दिशेने सुसाट वेगाने निघाले. वैजापूर पोलिसाच्या सर्व पथकांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. हा थरार रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सुरू होता. पोलीस मागावर असल्याचे बघून आरोपींनी त्यांचे वाहन पुरणगाव रोडवर नेऊन एका शेतीच्या कडेला लॉक करून उभे केले. त्यानंतर अंधारात शेताच्या दिशेने चोरटे पळत सुटले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. पोलिसांनी अंधारात शेतामध्ये दोन किलोमीटरपर्यंत पळत जाऊन दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. अन्य दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून दोन लोखंडी रॉड, जीप पोलिसांनी जप्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद