शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

चिस्तिया कॉलनी, जुना मोंढ्यात मध्यरात्री राडा; एमआयएमच्या माजी नगरसेवकासह ७ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 14:19 IST

चिस्तिया कॉलनीत नासेर पटेल आणि अज्जू नाईकवाडी यांच्यात मागील काही दिवसांपासून गच्चीवरील अवैध बांधकामावरून वाद सुरू होता.

औरंगाबाद : सिडको एन-६ भागातील चिस्तिया कॉलनी येथे अवैध बांधकामावरून बुधवारी मध्यरात्री दोन गटांत तुफान हाणामारी झाली. एमआयएमचे माजी नगरसेवक अज्जू नाईकवाडी, त्यांच्या भावासह दोन जण जखमी झाली. विरोधी गटाचे नासेर पटेल आणि अन्य चार जण जखमी झाले, दुसऱ्या घटनेत जुना मोंढा भागात होळीच्या निमित्ताने आयोजित जेवणाच्या कार्यक्रमात मानपानावरून वाद अधिक विकोपाला गेला.

चिस्तिया कॉलनीत नासेर पटेल आणि अज्जू नाईकवाडी यांच्यात मागील काही दिवसांपासून गच्चीवरील अवैध बांधकामावरून वाद सुरू होता. रात्री १२ वाजेच्या सुमारास वाद वाढत गेला. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढविला. विटा, चाकू, दगड, दांड्याने मारहाण करण्यात आली. नाईकवाडी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन जणांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाईकवाडी यांच्या भावाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पटेल यांच्याकडील जखमींना घाटीत दाखल केले.

जुना मोंढ्यात दगडफेकजुना मोंढा भागातील रोहिदासपुरा येथे भगत यांच्या घरासमोर होळीनिमित्त देवीच्या पूजेचा कार्यक्रम होता. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. त्यामध्ये मानपान देण्याच्या व जुन्या भांडणाच्या कारणावरून चौधरी कुटुंब व भगत कुटुंब यांच्यात वाद होऊन एकमेकांच्या विरोधात दगडफेक झाली. दोन्ही बाजूंचे आठ ते दहा जण जखमी झाले. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद