शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीच्या रस्त्यांची वाऱ्यावरून वरात; कंत्राटदाराच्या भरवशावरच होणार ५० कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 14:26 IST

एमआयडीसीला ‘थर्ड पार्टी इन्सपेक्शन’ लागू केले नसल्यामुळे सगळे काही कंत्राटदाराच्या भरवशावर सुरू असल्याचे दिसले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी सुनील चव्हाण व इतर अधिकाऱ्यांनी केली रस्त्यांची पाहणी ड्रेनेजची पेव्हींग ब्लॉक टाकून उंची वाढविल्याचे निदर्शनास आले.ग्रेडियंट, लेव्हलबाबत चुका झाल्या आहेत. एन-१ ते एपीआय कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावरील सरफेसवर ३ ते ४ मीमीचे तडे पडले आहेत.

औरंगाबाद : शासनाने गुणवत्तापूर्ण रस्ते व्हावेत, यासाठी शहरात मनपा, एमएसआरडीसी आणि एमआयडीसी अशा तीन संस्थांकडे तुकडे करून १५२ कोटी रुपयांची कामे वर्ग केली. मात्र एमआयडीसीकडे असलेल्या सुमारे ५० कोटींच्या रस्त्यांची वाऱ्यावरची वरात सुरू असून सगळा कारभार कंत्राटदाराच्या भरवशावर असल्याचे शुक्रवारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा प्रशासक सुनील चव्हाण यांच्या पाहणीअंती समोर आले.

एमजीएमसमोरील रस्ता खालीवर करून ठेवला आहे. चिकलठाणा उद्योगनगरीकडे जाणाऱ्या रस्त्याचे ग्रेडियंट, सरफेस बरोबर नाही. एपीआय कॉर्नर ते कलाग्रामपर्यंत असलेला हा रस्ता पुढे ३६ वरून २७ फूट करण्याचे मार्किंग कंत्राटदाराने केले आहे. वीजेचे खांब हटविण्यासाठी तरतूद केलेली असतांना हा सगळा कारभार फक्त मनपाने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सुरू असल्याचे सांगून कंत्राटदार व एमआयडीसीच्या अभियंत्यांनी चव्हाण यांच्यासमोर हात वर केले. एपीआय कॉर्नर ते प्रोझोन मॉल रस्त्यावरील ड्रेनेजची पेव्हींग ब्लॉक टाकून उंची वाढविली आहे. ग्रेडियंट, लेव्हलबाबत चुका झाल्या आहेत. एन-१ ते एपीआय कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावरील सरफेसवर ३ ते ४ मीमीचे तडे पडले आहेत. एमआयडीसीला ‘थर्ड पार्टी इन्सपेक्शन’ लागू केले नसल्यामुळे सगळे काही कंत्राटदाराच्या भरवशावर सुरू असल्याचे दिसले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, गणेश कॉलनी, जाधववाडी, घृष्णेश्वर कॉलनी, सिडको बसस्थानक परिसर, एपीआय कॉर्नर, प्रोझोन मॉल ते कलाग्राम रस्ता आणि एमजीएम रुग्णालय परिसरातील रस्त्यांची पाहणी चव्हाण यांनी केली. मनपा, एमआयडीसीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता चांगली ठेवारस्त्यांची कामे करताना चांगली गुणवत्ता ठेवा. काम पूर्ण झालेल्या रस्त्यांवर पुरेसे पाणी मारा. रस्त्याची योग्य उंची, सपाटीकरण, सारखेपणा, रस्त्यांच्या बाजूचे पदपथ व्यवस्थित करा, पार्किंग व्यवस्था करा, रिक्षा उभ्या करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्थित जागा ठेऊन दुभाजकांचे सौंदर्यीकरण करा, झाडांना कुंपण घाला आदी सूचना चव्हाण यांनी केल्या.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका