एमआयडीसीचा
By Admin | Updated: December 16, 2015 00:15 IST2015-12-16T00:08:23+5:302015-12-16T00:15:15+5:30
वाळूज महानगर : १३ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा बंद झाला होता. दरम्यान, मंगळवारी दुपारपासून पूर्ववत पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे उद्योजकांसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

एमआयडीसीचा
वाळूज महानगर : ब्रह्मगव्हाण येथील पंपहाऊसला मंगळवारी प्रकल्पग्रस्तांनी टाळे ठोकल्यानंतर वाळूज औद्योगिक परिसरासह १३ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा बंद झाला होता. दरम्यान, मंगळवारी दुपारपासून पूर्ववत पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे उद्योजकांसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने गोदावरी काठावर असलेल्या गावांचा वीजपुरवठा बंद केला होता. या गावातील वीजपुरवठा बंद झाल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. इशारा देऊनही वीजपुरवठा सुरू न झाल्यामुळे सोमवारी प्रकल्पग्रस्तांनी एमआयडीसीच्या ब्रह्मगव्हाण येथील पंप हाऊसला टाळे ठोकले होते.
त्यामुळे वाळूज औद्योगिक परिसरासह जालना, शेंद्रा, चिकलठाणा, बिडकीन तसेच बजाजनगर, रांजणगाव, जोगेश्वरी, सिडको वाळूज महानगर, वळदगाव, पाटोदा, वाळूज, पंढरपूर इ. गावांतील पाणीपुरवठा खंडित झाला होता. अचानक पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे औद्योगिक उत्पादनावरही परिणाम झाला.
पाण्याअभावी गैरसोय
मंगळवारी दुपारपर्यंत पाणी न आल्यामुळे वाळूज परिसरातील अनेक कारखान्यांत उत्पादनांवर परिणाम झाल्याचे उद्योजक अशोक थोरात, राहुल मोगले, सुनील किर्दत यांनी सांगितले. याशिवाय नागरी वसाहतीमधील नागरिकांनाही दोन दिवस पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागली. या परिसरातील अनेक नागरिकांना जारचे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागली.