एमआयडीसीत होणार सीड पार्क?

By Admin | Updated: November 11, 2016 00:22 IST2016-11-11T00:23:54+5:302016-11-11T00:22:40+5:30

जालना : जिल्ह्यात कृषी क्षेत्रात अमुलाग्र करणारा असा सीडपार्क जालना येथे होत आहे

MIDC to be seed park? | एमआयडीसीत होणार सीड पार्क?

एमआयडीसीत होणार सीड पार्क?

जालना : जिल्ह्यात कृषी क्षेत्रात अमुलाग्र करणारा असा सीडपार्क जालना येथे होत आहे. मात्र, तो नेमका कोठे व्हावा, तसेच कराव्या लागणाऱ्या आराखड्याबाबतची चर्चा गुरूवारी झालेल्या बैठकीत झाली. जालना तालुक्यातील पानशेंद्रा अथवा औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यात हा प्रकल्प होण्याची चिन्हे आहेत.
या बैठकीला जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे, महाबीजचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीडपार्कसाठी आराखडा तयार करण्याचे काम एका खाजगी एजन्सीला देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सीडपार्कमध्ये काय असावे, भविष्यात तरतुदी, संपूर्ण तांत्रिकबाबी तसेच पार्क संबंधीच्या मूलभूत मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. काही दिवसांत सीडपार्कचा डीपीआर तयार करून केंद्राचा निधी मिळविण्यासाठी सादर करण्यात येणार असल्याचे कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी जोंधळे तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पानशेंद्रा व औद्योगिक वसाहतीतील जागेची पाहणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: MIDC to be seed park?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.