म्हसोबा महाराजांची यात्रा भरलीच नाही;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:05 IST2021-05-07T04:05:56+5:302021-05-07T04:05:56+5:30

सिल्लोड तहसीलदारांनी केली सपत्नीक पूजा सिल्लोड : शहराचे आराध्यदैवत श्री म्हसोबा महाराज यांचा यात्रा महोत्सव रविवारी सुरू झाला. ...

Mhasoba Maharaj's journey was not full; | म्हसोबा महाराजांची यात्रा भरलीच नाही;

म्हसोबा महाराजांची यात्रा भरलीच नाही;

सिल्लोड तहसीलदारांनी केली सपत्नीक पूजा

सिल्लोड : शहराचे आराध्यदैवत श्री म्हसोबा महाराज यांचा यात्रा महोत्सव रविवारी सुरू झाला. मात्र कोरोनामुळे यावर्षीही यात्रा भरलीच नाही. तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या हस्ते मंदिरात विधिवत पूजाअर्चा, अभिषेक करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी श्री म्हसोबा महाराज मंदिरास भेट दिली. भाविक भक्तांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यात्रा भरवलीच नाही. त्यामुळे सत्तार यांनी नागरिकांचे आभार मानले. कोरोना जाऊ दे असे साकडे देवाला घातले. यावेळी नायब तहसीलदार संजय सोनवणे, आकाश तुपारे, मंदिराचे विश्वस्त लखन ठाकूर, अशोक बनसोडे, संतोष ठाकूर, बाबूराव वाकडे, दीपक वाघ ,गणेश चव्हाण, पुजारी सागर कोठाळे, मनोज कोठाळे, दीपराज कोठाळे, सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, राजू कटारीया, संजय मुटकुटे, राजेंद्र बन्सोड उपस्थित होते.

(फोटो)

सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सपत्नीक श्री म्हसोबा महाराज यांची विधिवत पूजाअर्चा करून अभिषेक केला.

060521\img_20210502_193307.jpg

कॅप्शन

सिल्लोड तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सपत्निक श्री म्हसोबा महाराज यांची विधिवत पूजा अर्चा करून अभिषेक केला.

2) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी श्री म्हसोबा महाराज यांच्या मंदिरास भेट देऊन कोरोना जाऊ दे असे साकडे घातले

Web Title: Mhasoba Maharaj's journey was not full;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.