शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावरून मेट्रो रेल्वे धावणे सध्या शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:41 IST

समृद्धी महामार्गावर ३७ वर्षे लागणार टोल 

ठळक मुद्देसध्या १२० पैकी ४९ मीटर जागा वापरली आहे.  १२० कि़मी. कोड बदलून ते १५० कि़मी. ताशी वेग

औरंगाबाद : मुंबई-नागपूर महामार्ग अर्थात समृद्धी महामार्गावरूनमेट्रोरेल्वे धावणे सध्या शक्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले. जागा उपलब्ध नसल्यामुळे मेट्रो धावणे शक्य नाही. जर भविष्यात मेट्रोसाठी नियोजन करायचे ठरले, तर नव्याने भूसंपादन करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

हाय स्पीड रेल्वे चा सध्यातरी मुद्दा नाही. ही रेल्वे महामार्गावरून जाणार तरी कुठून? कारण महामार्गाचा मध्य दुभाजक १५ मीटरचा आहे. रेल्वेसाठी किमान १७ मीटरचा दुभाजक लागतो. त्यामुळे सध्या तरी जागा वाढविणे शक्य नाही. नव्याने भूसंपादन करून रेल्वेचा विचार करावा लागेल. आठ पदरी महामार्ग होणार आहे. १५ मीटरचा काँक्रीटचा पट्टा त्यामध्ये असेल. २० कोटींचा पेव्हर त्यासाठी टाकण्यात येणार आहे. १२० कि़मी. कोड बदलून ते १५० कि़मी. ताशी वेग असे करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईकडून त्यासाठी बदल करण्यात आले आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले. सध्या चौपदरीकरण सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाचा भविष्यात विस्तार करायचा ठरल्यास त्यासाठी वाव असेल. १२० मीटरपर्यंत भूसंपादन केलेले आहे. सध्या १२० पैकी ४९ मीटर जागा वापरली आहे. 

आठ लाख वृक्षांची लागवडआवाज आणि तापमानाला आटोक्यात ठेवण्यासाठी सुमारे आठ लाख झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावण्यात येतील, असा दावा गायकवाड यांनी केला. सध्या १ लाख ७४ हजार ८९६ पैकी १ लाख ३० हजार ९३२ वृक्षतोड करण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

समृद्धीवर ३७ वर्षे लागणार टोल राज्याची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरला जोडणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. २०२१ च्या जुलैपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, त्या मार्गावरून प्रवास करायचा झाल्यास प्रति कि़मी. एक रुपया ६५ पैसे एवढी रक्कम चारचाकी वाहनाला प्रवासासाठी मोजावी लागेल. ११६५ रुपये ७०१ कि़मी.साठी टोल लागणार आहे. वाहनांनुसार टोलचा दर असणार आहे. २०२१ पासून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण जोमाने खुला होईल. तेव्हापासून दिवसाकाठी ४० हजार वाहने त्यावरून धावतील, असा अंदाज एमएसआरडीसीने बांधला आहे. महामार्ग बांधणीचा कालावधी धरून एकूण ४० वर्षांपर्यंत वाहनधारकांना टोल द्यावा लागेल.  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादMetroमेट्रोrailwayरेल्वे