अॅपद्वारे पाठविता येणार मीटर रिडींग
By Admin | Updated: July 23, 2016 00:52 IST2016-07-23T00:36:51+5:302016-07-23T00:52:36+5:30
जालना : वीज वापर नसताना बिल आले, संबंधित कर्मचाऱ्यांनी रिडींगच घेतली नाही, चुकीची रिडींग घेतली असे अनेक प्रश्न वीज ग्राहकांचे असतात.

अॅपद्वारे पाठविता येणार मीटर रिडींग
जालना : वीज वापर नसताना बिल आले, संबंधित कर्मचाऱ्यांनी रिडींगच घेतली नाही, चुकीची रिडींग घेतली असे अनेक प्रश्न वीज ग्राहकांचे असतात. आता वीज ग्राहकांना वीज मीटरमधील रिडींगचे छायाचित्र काढून ते महावितरणच्या सर्व्हरला पाठविता येणार आहे. त्यामुळे एजन्सीच्या कर्मचाऱ्याने घेतलेलेरिडींग व ग्राहकाने घेतलेले रिडींग याची शहानिशा करून ग्राहकांचे समाधान करण्यात येणार आहे.
महावितरण कंपनीने नुकतेच ग्राहकांसाठी ‘अॅप’ तयार केले आहे. या अॅपला प्रतिसाद मिळत असून, पंधरा दिवसांत लाखो ग्राहकांनी या अॅपचा वापर सुरू केला आहे. वीज बिल तपासणी, ई-बिल आदींसोबतच आता अॅपच्या माध्यमातून रिडींगची समस्याही निकाली निघणार आहे. एखाद्या ग्राहकाला वीज बिलाबाबत शंका आल्यास वीज मीटरमधील रिडींगचा फोटो काढून ते महावितरणच्या संकेतस्थळावर पाठविण्यात येणार आहे. ‘महावितरण डॉट कॉम’ या संकेतस्थळाशी हे अॅप जोडलेले आहे.
वीज ग्राहकांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून सदर छायाचित्र या संकेत स्थळावर ‘अपलोड’ केल्यास ग्राहकांची तक्रार तपासून योग्य ते बिल वितरित करण्यात येणार आहे. यासाठीचे प्रात्यक्षिक महावितरणकडून देण्यात येणार आहे.
यापूर्वी औरंगाबाद येथे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. ग्राहकांना सुलभ सेवेसोबतच त्यांच्या तक्रारींचा निपटाराही अॅपस्मुळे तात्काळ होणार आहे. (प्रतिनिधी)