जिल्हा मजूर सहकारी संस्था निवडणुकीत मेटेंचा पॅनल

By Admin | Updated: June 22, 2015 00:21 IST2015-06-21T23:17:37+5:302015-06-22T00:21:40+5:30

बीड : जिल्हा मजूर सहकारी संस्था निवडणुकीत शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांनी स्वतंत्र पॅनल उभा केला आहे. याची घोषणा त्यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

Metannah panel in district labor co-operative elections | जिल्हा मजूर सहकारी संस्था निवडणुकीत मेटेंचा पॅनल

जिल्हा मजूर सहकारी संस्था निवडणुकीत मेटेंचा पॅनल


बीड : जिल्हा मजूर सहकारी संस्था निवडणुकीत शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांनी स्वतंत्र पॅनल उभा केला आहे. याची घोषणा त्यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली. स्व. गोपीनाथराव मुंडे यांना शेवटच्या काळात त्रास देणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठीच या निवडणुकीत उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसंग्रामच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, डॉ. रमेश पानसंबळ आदी उपस्थित होते.
मेटे म्हणाले, मजूर सहकारी संस्थेवर मागील २५ ते ३० वर्षांपासून विशिष्ट मंडळींचा वरचष्मा आहे. मजुरांचे हित न पाहता अनेक चुकीची कामे याकाळात झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. संस्थेचा कारभार सुधारण्यासाठी अन् मनमानी कारभार करणाऱ्यांना ताळ्यावर आणण्यासाठी काही मतदार पुढे आले. त्यांच्या आग्रहाखातर स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जिल्हा मजूर फेडरेशन परिवर्तन पॅनल उभा केला. १६ पैकी ३ जागा बिनविरोध निघालेल्या आहेत. त्यामुळे १३ जागांवर उमेदवार दिल्याचे ते म्हणाले.
व्यसनमुक्तीची मोहीम
२६ जून रोजी व्यसनमुक्त दिनानिमित्त शिवसंग्राम जनजागृती करणार आहे. जिल्हा व्यसनमुक्त व्हावा, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Metannah panel in district labor co-operative elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.