लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आम्ही मागासलेले आहोत हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. येथे विकासाच्या दृष्टीने अनकूल वातावरण तर आहेच; परंतु क्षमताही आहे. फक्त दुसºया प्रांताचे अनुकरण न करता आपणास स्वयंभू विकासाची गती वाढवावी लागेल. यासाठी प्रथम ‘मागासलेले’ शब्दाला निरोप द्या, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी मंगळवारी येथे केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा इन्स्टिट्यूट आॅफ सोशियो-इकॉनॉमिक रिसर्च अँड नॅशनल इंटिग्रेशन या संस्थेच्या वतीने डॉ. चितळे यांना यंदाचा पद्मविभूषण स्व. गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘मराठवाड्याचा भविष्यकालीन वाटा’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. मंगळवारी सायंकाळी स. भु. परिसरातील गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीत आयोजित कार्यक्रमात मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी, स्वातंत्र्यसैनिक ना. वि. देशपांडे, स. भु. संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, तर अध्यक्षस्थानी डॉ. एस. बी. वराडे यांची उपस्थिती होती. भुजंगराव कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. चितळे यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच त्यांची पत्नी विजया चितळे यांचा सत्कार प्राचार्या मनोरमा शर्मा यांनी केला. माधवराव चितळे म्हणाले की, मराठवाडा कृषिप्रधान व्यवस्थेवर आधारित आहे, हा गैरसमज आहे. कारण येथे अवघी १३ टक्केच जमीन शेतीसाठी चांगली आहे. ६४ टक्के जमीन मध्यम प्रकारची, तर २२ टक्के जमीन पडीक (पान २ वर)
‘मागासलेले’ शब्दाला निरोप द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:51 IST