बाप्पांना निरोप

By Admin | Updated: September 29, 2015 00:46 IST2015-09-29T00:28:23+5:302015-09-29T00:46:42+5:30

बीड : ‘गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘बाप्पा मोरया रे’ अशा जयघोषात रविवारी लाडक्या गणरायाला मोठ्या हर्षोल्हासात निरोप देण्यात आला.

Message to the father | बाप्पांना निरोप

बाप्पांना निरोप



बीड : ‘गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘बाप्पा मोरया रे’ अशा जयघोषात रविवारी लाडक्या गणरायाला मोठ्या हर्षोल्हासात निरोप देण्यात आला. जिल्हाभरात बंदी असतानाही डॉल्बीचा आवाज वाढलेला पहावयास मिळाला. किरकोळ प्रकार वगळता गणेश विसर्जन शांततेत पार पडले.
‘शांताबाय’वर भक्तांचा ठेका!
गणेश विसर्जन मिरवणुकीत ठिकठिकाणी ‘शांताबाय’ या मराठी गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या गीतावर गणेशभक्तांनी ठेका धरला होता. बच्चेकपंनीसह वृद्धांनाही या गाण्याने ठेका धरण्यास भाग पाडले.
खापरपांगरी छावणीत
शेतकऱ्यांना पंगत
गणपती विसर्जनानिमित्त खापरपांगरी (ता. बीड) येथील ओंकार सेवाभाावी संस्थेच्या चारा छावणीत शेतकऱ्यांना रविवारी पंगत देण्यात आली. छावणीत बसविलेल्या गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर पंगत पार पडली. छावणी संचालक अशोक हिंगे यांनी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था केल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी माजी मंत्री सुरेश नवले, माजी आ. राजेंद्र जगताप, प्रा. सुशीला मोराळे, डॉ. रमेश पानसंबळ, सुहास पाटील, सुधाकर चव्हाण, बंडू आजबे, हरिदास घोगरे, गोरख चव्हाण, नामदेव शेंडगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
माजलगाव तालुक्यातील हिंगणी (खुर्द) येथे सकाळी ११ वाजता सहायक फौजदार रमेश पुरी यांनी अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या अशोक निवृत्ती सोळंके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून ८१६ रूपयांचा माल पकडला. रात्री बंदोबस्तासाठी पुरी व एम.ए.बदने हे गेले होते. मिरवणुकीदरम्यान रात्री दहाच्या सुमारास दारूची केस का दाखल केली ? अशी कुरापत काढुन आरोपी दत्ता बालासाहेब सोळंके व इतरांनी पोलिसांना दगडाने मारहान केली. यात बदने यांच्या डोक्यास मार लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. आरोपीविरूध्द दिंद्रूड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डॉल्बी लावून कमाल आवाजाची पातळी (७५ डेसीबल) चे उल्लंघन करणाऱ्या १६ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परळीतील १, केजमध्ये २, माजलगावात ४ तर आष्टीत १ मंडळावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. बीडमध्ये पेठ बीड ठाण्यात तुळजाभवानी, महाराष्ट्र, न्यू साईगणेश, भोईराज, ओझर गणेशमंडळाविरूद्ध तर शहर ठाण्यात तीन मंडळांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डीजे चालक, मालक, वाहनचालकांनाही आरोपी करण्यात आले आहे.

Web Title: Message to the father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.