शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरण यंत्रणा शासनात विलिन करा

By admin | Updated: December 8, 2015 00:04 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यंत्रणा शासनात विलिन करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने सुरू केलेल्या

उस्मानाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यंत्रणा शासनात विलिन करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून येथेही कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून सामुदायिक धरणे आंदोलन सुरू केले आहे.मुळात जीवन प्राधीकरण हे शासानाचे पाणीपुरवठा खाते होते. शासनाच्या सोईसाठी मंडळ-विभाग स्थापन करून या पाणीपुरवठा खात्यास मंडळ/विभागात रूपांतरित केले आहे. त्यावेळी मंडळास सर्व शासनाचे नियम व अटी तसेच फायदे मिळतील असे सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून प्राधिकरणाची कामे शासनानेच अन्यत्र वर्ग केल्यामुळे व ईटीपी चार्जेस १७.५ टक्के वरून पाच टक्क्यांपर्यंत आणल्यामुळे प्राधिकरण आर्थिक संकटात सापडले. परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, आश्वासित प्रगती योजना यासारख्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. तसेच त्यांचे वेतन व भत्ते अदा करण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणा शासनात विलीन करावी, यासाठी नोंदणीकृत पंधरा संघटनांनी एकत्रित येवून संयुक्त संघटना संघर्ष कृती समिती स्थापन केली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली २४ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ४ डिसेंबर रोजी सामुदायिक रजा आंदोलन तर सोमवारी धरणे आंदोलन आणि काम बंद आंदोलन करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनात जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर. एस. ढवळे, उपकार्यकारी अभियंता राजकुमार पांडव, बी. एन. तांबोळी, आर. बी. सूर्यवंशी, एस. आर. पडवळ, पी. आर. भोई, आर. जे. राजूरकर आदी अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)