दया परत येतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:02 IST2021-02-05T04:02:06+5:302021-02-05T04:02:06+5:30

सीआयडी मालिकेमधील कलाकारांनी फॅन्सच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या मालिकेतील दया म्हणजेच दयानंद शेट्टी हा तर ...

Mercy is coming back | दया परत येतोय

दया परत येतोय

सीआयडी मालिकेमधील कलाकारांनी फॅन्सच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या मालिकेतील दया म्हणजेच दयानंद शेट्टी हा तर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. प्रेक्षकांचा लाडका दया आता पुन्हा एकदा एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. सावधान इंडिया हा गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आता दयानंद शेट्टी करणार आहे. दयानंदचा या कार्यक्रमात प्रवेश झाल्यानंतर या कार्यक्रमात काही बदलदेखील केले जाणार आहेत. दयानंदसोबत या मालिकेत अंकुर नय्यर आणि मानिनी मिश्रा हे कलाकारदेखील पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सुझानच्या कामाचे हृतिकने केले कौतुक

हृतिक रोशन आणि इंटेरिअर डिझायनर सुझान खान यांना विभक्त होऊन बराच काळ झाला आहे. त्यानंतरही ते दोघे चांगले मित्र आहेत. सुझानने तिच्या इंटेरिअर डिझाइनिंगचे स्किल दाखवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावर हृतिकने कमेंट करत सुझानची स्तुती केली आहे. “जेव्हा ग्लॅडिएटर्सचे काम एखाद्या खेळासारखे असते” अशा आशयाचे कॅप्शन सुझानने त्या व्हिडीओला दिले आहे. सुझानची मेहनत बघून अनेक कलाकारांनी तिची स्तुती केली. परंतु, सगळ्यांचे लक्ष हे हृतिकच्या कमेंटकडे गेले आहे. “अप्रतिम” अशी कमेंट हृतिकने केली आहे.

ट्रोल करणाऱ्याला मिलिंद सोमणचे भन्नाट उत्तर

देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून अभिनेता मिलिंद सोमण ओळखला जातो. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा मिलिंद आज फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी त्याने केलेले न्यूड फोटोशूट चर्चेत होते. त्या फोटोवरुन मिलिंदला आजही ट्रोल केले जाते. नुकताच मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने हा १ जानेवारी रोजी काढलेला फोटो असल्याचे म्हटले आहे. एका यूजरने मिलिंदच्या या फोटोवर ‘हेच ते भाऊ जे नागडे धावलेले अशी बातमी होती’ अशी कमेंट केली होती. त्या यूजरला मिलिंदने उत्तर देत ‘जे नागडे धावतात’ असे म्हटले होते. त्याच्यासोबत मिलिंदने हसण्याचा इमोजीदेखील वापरला होता.

Web Title: Mercy is coming back