पारा चढला अन् विजेचा वापर वाढला

By Admin | Updated: April 7, 2015 01:27 IST2015-04-07T01:07:55+5:302015-04-07T01:27:29+5:30

औरंगाबाद : एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून, उन्हाचा पारा चढत आहे. या वातावरणातील बदलाचा परिणाम शहराच्या वीजपुरवठ्यावर होताना दिसून येत आहे.

Mercury increased and electricity consumption increased | पारा चढला अन् विजेचा वापर वाढला

पारा चढला अन् विजेचा वापर वाढला


औरंगाबाद : एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून, उन्हाचा पारा चढत आहे. या वातावरणातील बदलाचा परिणाम शहराच्या वीजपुरवठ्यावर होताना दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे विजेचा वापर वाढल्यामुळे दररोज ५० मेगावॅटने विजेची मागणी वाढली आहे.
शहरात अडीच लाख वीज ग्राहक आहेत. त्यांना दररोज ३५० मेगावॅट वीज लागते. एप्रिलच्या सुरुवातीला उन्हाचा पारा चढला आहे. त्यामुळे शहरातील वीजपुरवठ्याची मागणी वाढली आहे. उन्हाचा पारा चढल्यामुळे फॅन, कूलर, फ्रीजचा २४ तास वापर वाढला आहे. सध्या ४०० मेगावॅट वीज लागत आहे. मात्र, ग्रामीण भागातील कृषिपंपाचा वापर कमी झाल्यामुळे अतिरिक्त वीज खरेदी करण्याची गरज कंपनीला भासणार नाही. त्यामुळे विजेची मागणी वाढल्याचा परिणाम सेवा आणि अर्थकारणावर होणार नाही, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.
लाईन खराब होण्याचे प्रमाण वाढले
शहरातील अनेक भागातील वीजवाहिन्या जुन्या झालेल्या आहेत. त्यामध्ये विजेची मागणी वाढल्यामुळे त्या वाहिन्यांवर विजेचा दाब अधिक पडल्यामुळे विद्युत लाईन खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

Web Title: Mercury increased and electricity consumption increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.