पारा ४१ अंशांवर
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:10+5:302016-04-03T03:50:16+5:30
जालना : कडक उन्हामुळे एप्रिल महिन्यात तापमान चाळीशी गाठत आहे. शनिवारी दुपारी आठ तालुक्यांपैकी चार तालुक्यांचे तापमान ४१ अंश त

पारा ४१ अंशांवर
जालना : कडक उन्हामुळे एप्रिल महिन्यात तापमान चाळीशी गाठत आहे. शनिवारी दुपारी आठ तालुक्यांपैकी चार तालुक्यांचे तापमान ४१ अंश तर उर्वरित चार तालुक्यांचे तापमान ४० अंश नोंदविले गेले. उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन ठप्प होत आहे.
शनिवारी सकाळपासून उन्हाचा पारा चढलेला होता सकाळी ३५ अंशांवर असलेले तपमान दुपारी ४० ते ४१ अंशावर गेले. उष्णतेमुळे शहरासोबतच ग्रामीण भागातही बाजारपेठा व रस्ते निमर्नुष्य होण्यासोबतच उष्णतेमुळे अबालवृद्धांचे हाल होत आहेत. शनिवारी जालना, बदनापूर, मंठा व परतूर तालुक्यात तापमान तब्बल ४१ अंश नोंदविले गेले. तर भोकरदन, जाफराबाद, अंबड, घनसावंगी तालुक्यात तापमान ४० अंश नोंदविले गेले.