व्यापाऱ्याची १७ लाख रुपयांची फसवणूक
By Admin | Updated: July 23, 2016 01:06 IST2016-07-23T00:30:43+5:302016-07-23T01:06:36+5:30
गेवराई : येथे ड्रीप यंत्र देण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्यास कंपनीच्या खात्यात पैसे भरायला सांगून नंतर हलके यंत्र देऊन १७ लाख रुपयांना फसवले.

व्यापाऱ्याची १७ लाख रुपयांची फसवणूक
गेवराई : येथे ड्रीप यंत्र देण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्यास कंपनीच्या खात्यात पैसे भरायला सांगून नंतर हलके यंत्र देऊन १७ लाख रुपयांना फसवले. याप्रकरणी येथील ठाण्यात गुरुवारी मध्यप्रदेशातील कंपनीविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
शामसुंदर बन्सीलाल भुतडा (रा. गेवराई) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आॅक्टोबर २०१५ मध्ये त्यांनी ड्रीप यंत्रासाठी इंदौर, मध्यप्रदेशातील कंपनीच्या बँक खात्यात २४ लाख रुपये भरले. मात्र, नंतर केवळ सात लाख रुपयांचे यंत्र पाठवून दिले. उर्वरित रक्कम देण्यास नकार दिला. याप्रकरणी भुतडा यांच्या फिर्यादीवरुन सुधीर देवीप्रसाद जैस्वाल, रा. ब्रम्हगाव कॉलनी, इंदौर, मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. (वार्ताहर)