शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याच्या पाठीत मनपाने खुपसला खंजीर

By admin | Updated: August 17, 2014 01:43 IST

औरंगाबाद : शासनाने राज्यातील सर्व महापालिकांना जकात किंवा एलबीटी यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेने पुन्हा जकात लावण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

औरंगाबाद : शासनाने राज्यातील सर्व महापालिकांना जकात किंवा एलबीटी यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेने पुन्हा जकात लावण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापारी आणि उद्योजकांनी आज एका पत्रकार परिषदेत मनपाने व्यापाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे.राज्यात सर्वच महापालिकांमध्ये पूर्वी जकात आकारणी करण्यात येत होती. व्यापाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन केल्यानंतर शासनाने जकात हटवून एलबीटी लावला होता. आता व्यापाऱ्यांनी यालाही विरोध दर्शविला. त्याऐवजी जीएसटी प्रणाली लागू करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, शासनाने सर्व महापालिकांना जकात किंवा एलबीटी दोन्हीपैकी एक कोणताही कर लावण्याची मुभा दिली. औरंगाबाद महापालिकेने जकात कर लावण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आज चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआय) येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष राम भोगले आणि माजी अध्यक्ष मानसिंग पवार यांनी महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केला. औरंगाबादेतील एलबीटी प्रक्रिया राज्यासाठी रोल मॉडेल ठरली असताना परत जकात लावण्याचा विचार होतोच कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दोन महिन्यांपूर्वी व्यापाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते, तेव्हासुद्धा ७० टक्के कर भरण्यात आला. कारण शहराच्या विकासासाठी आम्ही सहकार्य केले. महापालिका प्रशासन शहराला पुढे नेण्याऐवजी उलट मागे नेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही सर्व व्यापारी आणि उद्योजक बहिष्कार घालणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला. औरंगाबादेत एलबीटीच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे २०० कोटी रुपये जमा होत आहेत. एकट्या चिकलठाणा एमआयडीसीमधून एलबीटी आणि टॅक्सच्या माध्यमातून मनपाला ७२ कोटी रुपये मिळतात. जकातीसारखा वादग्रस्त विषय मनपाने हाताळू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेस व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा, अजय शहा, झोएब येवलावाला, मासिआचे अध्यक्ष भरत मोतिंगे, आयसाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, तनसुख झांबड आदींची उपस्थिती होती.