उष्माघाताने व्यापाऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: May 12, 2017 23:33 IST2017-05-12T23:31:44+5:302017-05-12T23:33:42+5:30
साळेगाव : केज तालुक्यातील साळेगाव येथील गुरुवारच्या आठवडी बाजारात फळविक्रेत्याचा उष्माघाताने मृत्यू झाला.

उष्माघाताने व्यापाऱ्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
साळेगाव : केज तालुक्यातील साळेगाव येथील गुरुवारच्या आठवडी बाजारात फळविक्रेत्याचा उष्माघाताने मृत्यू झाला.
मोहम्मदअली अब्बासअली काझी असे फळविक्रेत्याचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काझी हे हातगाड्यावर फळविक्री करीत असत. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात उन्हाचा पारा वाढला आहे. ऊन सहन न झाल्यामुळे काझी हे जमिनीवर कोसळले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे जिल्ह्यात तिसरा बळी गेला आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.