औश्यात भाविकांची मांदियाळी

By Admin | Updated: January 29, 2017 23:52 IST2017-01-29T23:52:07+5:302017-01-29T23:52:44+5:30

औसा : येथील श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानची माघवारी पायी दिंडी पालखीसह श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रविवारी दुपारी रवाना झाली़

Menti | औश्यात भाविकांची मांदियाळी

औश्यात भाविकांची मांदियाळी

औसा : येथील श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानची माघवारी पायी दिंडी पालखीसह श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रविवारी दुपारी रवाना झाली़ दिंडीत हजारो भाविक, वारकरी सहभागी झाले आहेत़
रविवारी दुपारी ४ वा़ गोपाळपूर येथील ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरापासून पालखीचे प्रस्थान झाले़ संस्थानचे पीठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली निघालेल्या या दिंडीत महाराष्ट्र, आंध्र व कर्नाटकातील शिष्यगणांसह पाच ते सहा हजार वारकरी सहभागी झाले आहेत़ दिंडींचा आजचा पहिला मुक्काम बोरफळ येथे झाला़ उजनी, केशेगाव, तुळजापूर, शेळगाव, नरखेड, तात्याबाचे सारोळे असा मुक्काम करीत ५ फेब्रुवारीस चंद्रभागेच्या तिरी ही दिंडी पोहोचणार आहे़ पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या तिरावर दिंडीचा तीन दिवस मुक्काम असतो़ विठ्ठल मंदिरात त्रयोदशीदिनी सद्गुरु गुुरुबाबा महाराजांचे चक्रीभजन होऊन चतुर्थीस दिंडीचा परतीचा प्रवास सुरु होतो़

Web Title: Menti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.