दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्याला मानसिक आधार
By Admin | Updated: January 2, 2015 00:46 IST2015-01-02T00:40:13+5:302015-01-02T00:46:08+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ ही बाब लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी

दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्याला मानसिक आधार
बाळासाहेब जाधव , लातूर
दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ ही बाब लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी लातूर पंचायत समितीने शेतकऱ्यांच्या सेवेसाठी टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे़ या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आठवडाभरापासून सुरु केला आहे़
चालू वर्षामध्ये गारपीट व अल्प पर्जन्यमानामुळे खरीप व रबी हंगामही गेला़ परंतु शेतकऱ्याला दोन्हीही हंगामामध्ये उत्पन्न घेता आले नाही़ यामध्ये काही शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज, सोसायटीचे कर्ज, खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर पंचायत समितीचे सभापती रावसाहेब भालेराव यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ०२३८२-२४२९९० हा टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे़
या नंबरवर संपर्क साधून शेतकऱ्याने आपल्या अडचणी सभापती रावसाहेब भालेराव, उपसभापती अॅड़ लक्ष्मण पाटील, गटविकास अधिकारी धनवंतकुमार माळी यांच्याकडे मांडाव्यात. त्यातून मार्ग काढण्यासाठी लातूर पंचायत समिती प्रयत्नशील आहे़४
लातूर पंचायत समितीच्या वतीने कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला मानसीक आधार देण्याचे काम २२ डिसेंबरपासून सुरु केले आहे़ यामध्ये ९ दिवसात ५४ शेतकऱ्यांनी टोल फ्री नंबरचा आधार घेऊन आपल्या अडचणी पंचायत समितीशी संपर्क साधून दूर केल्या आहेत़
कडबाकुट्टी यंत्राचे वाटप
४लातूर पंचायत समिती अंतर्गत दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी टोल फ्री बरोबर इतर उपक्रमही हाती घेतले जात आहेत़
४यामध्ये तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने आहे तो चारा जास्तीत जास्त दिवस पुरवणी व्हावा यासाठी आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते २०६ शेतकऱ्यांना कडबा कटर यंत्राचे वाटप केले आहे़
लातूर तालुक्यासह शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर पंचायत समिती अंतर्गत शेतकऱ्यांना मानसीक आधार देण्यासाठी टोल फ्री क्रमांकाचे नियोजन करण्यात आले असून या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी दुर करण्याचे काम लातूर पंचायत समितीमार्फत सुरु करण्यात आले असून यासाठी शेतकऱ्याचे नाव व नंबर घेण्यासाठी पूर्णवेळ कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे़
- धनवंतकुमार माळी, गटविकास अधिकारी, पं़स़लातूर.