शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत महिलांसाठी राखीव जागांवर बसतात पुरुष; उठवणार कोण? काय सांगतो नियम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 20:21 IST

प्रवासाच्या प्रारंभी जागेवरून उठविता येते; मधल्या थांब्यावर मात्र राखीव जागावरून प्रवाशाला उठविता येत नाही

छत्रपती संभाजीनगर : एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलत असल्याने त्यांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत महिलांसाठी राखीव असलेल्या सीटवर पुरुष बसतात. राखीव आसनावर सुरुवातीच्या थांब्यावर इतर प्रवासी बसलेला असेल तर सवलतधारक प्रवाशासाठी त्या प्रवाशाला जागेवरून उठविता येते. परंतु, प्रवासाच्या मधल्या थांब्यावर राखीव जागांवरून सवलतधारकासाठी कोणालाही उठविता येत नाही.

सवलतधारकांसाठी साधी, निमआराम, शिवाई, शिवशाही बसमध्ये वेगवेगळी आसने निश्चित केलेली आहे. या राखीव जागांवर सुरुवातीच्या थांब्यावर इतर कोणी बसलेले असेल तर त्यास उठविता येते. परंतु मधल्या थांब्यावर राखीव जागावरून प्रवाशाला उठविता येत नाही. दिव्यांग प्रवाशाला मात्र प्रत्येक थांब्यावर जागा उपलब्ध करून दिली जाते.

एसटी बसध्ये कोणासाठी किती जागा राखीवमहिला : लाल बस म्हणजे, साध्या बसमध्ये महिलांसाठी १९ ते २२ आणि २९, ३० क्रमांकाचे आसन राखीव आहे.दिव्यांग : साध्या बसमध्ये ३ ते ६ क्रमांकाचे आसन राखीव आहे.ज्येष्ठ नागरिक : लाल बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी साध्या बसमध्ये ११ आणि १२ क्रमांकाचे आसन राखीव आहे.स्वातंत्र्य सैनिक : साध्या बसमध्ये स्वातंत्र्य सैनिकांसाठी १३,१४ क्रमांकाचे आसन आहे.एसटी कर्मचारी : लाल बसमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी ३१ आणि ३२ क्रमांकाचे आसन राखीव आहे.अधिस्वीकृतीधारक पत्रकार : २७ आणि २८ क्रमांकाचे आसन लाल बसमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी राखीव असते.

बसमध्ये महिलांची गर्दी वाढलीएसटीत महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत दिली जाते. ही सवलत सुरू झाल्यापासून एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. गेल्या दीड वर्षात म्हणजे एप्रिल २०२३ ते जून २०२४ या कालावधीत तब्बल १ कोटी ८२ लाख महिलांनी ‘लाल परी’ने प्रवास केला.

राखीव जागांवर अन्य कोणी बसला तरबसमध्ये ज्यांच्यासाठी आसन राखीव आहे, तो बसमध्ये नसेल तर इतर प्रवासी त्यावर बसू शकतात. मात्र, संबंधित लाभधारक जर बसमध्ये आल्यास इतर प्रवाशाला आसन त्या प्रवाशाला द्यावे लागते. वाहकाला सूचित केल्यास राखीव जागेवरील प्रवाशाला उठवता येते.

‘लोकमत’ने काय पाहिले?वाशिम - नाशिक : मध्यवर्ती बसस्थानकात ही बस उभी होती. यावेळी महिलांच्या जागेवर पुरुष बसलेले होते. याच वेळी काही महिला बसमध्ये चढल्या. परंतु जागा नसल्याचे पाहून त्या पुन्हा खाली उतरल्या.छत्रपती संभाजीनगर - पुणे-राजगुरुनगर : बसमध्ये महिलांसाठी राखीव जागेवर तरुण बसलेला होता. परंतु त्याला जागेवरून उठण्याचा आग्रह धरण्याऐवजी महिला प्रवासी जागा शोधत होती.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबाद