आठवणींनी दाटून आले कंठ !

By Admin | Updated: June 16, 2014 01:13 IST2014-06-16T00:05:59+5:302014-06-16T01:13:59+5:30

बीड: केंद्रीय ग्राम विकास मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथरावमुंडे यांना येथील चंपावती क्रीडा संकुल मैदानावर रविवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Memories came from the throat! | आठवणींनी दाटून आले कंठ !

आठवणींनी दाटून आले कंठ !

बीड: केंद्रीय ग्राम विकास मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथरावमुंडे यांना येथील चंपावती क्रीडा संकुल मैदानावर रविवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याबद्दल ज्या चंपावती मैदानावर त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार होता त्याच ठिकाणी शोकसभा घेण्याचा दुर्दैवी प्रसंग कार्यकर्त्यांवर ओढावला़ मुंडे यांच्या आठवणींनी शोकसभेत मान्यवरांसह उपस्थितांचे कंठ दाटून आले़ यावेळी पक्षासह विरोधी पक्षातील नेत्यांनीही मुंडे यांच्या कर्तृत्वाचे तोंडभरून कौतूक केले़
शोकसभेच्या प्रारंभी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खा. चंद्रकांत खैरे, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. बदामराव पंडित, माजी आ. सुरेश नवले, माजी आ. उषा दराडे, गटनेते डॉ. भारतभुषण क्षीरसागर, राजेंद्र जगताप, माजी आ. जनार्दन तुपे, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, राजेंद्र मस्के आदींची उपस्थिती होती.
खा. रजनी पाटील, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, माजी मंत्री अशोक पाटील, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, रासपचे प्रमुख महादेव जानकर, आ़ विनायक मेटे, माजी आ. पाशा पटेल, केशव आंधळे, सुरेश नवले, राजेंद्र जगताप, सय्यद सलिम, आदिनाथ नवले, उषा दराडे, साहेबराव दरेकर, राधाकृष्ण होके पाटील, मोहनराव साळुंके, रमेश आडसकर, जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, सत्यनारायण लाहोटी, कॉ. नामदेव चव्हाण, डॉ. सुभाष जोशी, अ‍ॅड. लक्ष्मण पवार, डॉ. भारतभुषण क्षीरसागर, प्रा. सुशीला मोराळे, सय्यद नवीदुजम्मा, राजेंद्र मस्के, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रिपाईचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, राकाँ जिल्हाध्यक्ष अशोक डक, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, राजेश सरकटे, एकनाथ आव्हाड, फुलचंद कराड, महादेव जानकर यांच्यासह आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या़
यावेळी गटनेते मदनराव चव्हाण, भगिरथ बियाणी, शेख फारुक, अ‍ॅड़ सर्जेराव तांदळे, भाई गंगाभीषण थावरे, अ‍ॅड़ हेमा पिंपळे, चंद्रकांत नवले, काँग्रेसचे अशोक हिंगे, सभापती संदीप क्षीरसागर, हभप़ राधा सानप, अजय सवाई, सचिन मुळूक, सुदर्शन धांडे, स्वप्नील गलधर, सुधीर शिंदे, परमेश्वर सातपूते, जि़प़ च्या माजी अध्यक्षा मीेरा गांधले, कुंदा काळे, संदीप उबाळे, राजेंद्र बांगर आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी स्तब्ध राहून मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मुंडेंच्या आठवणींची चित्रफित दाखविण्यात आली. (प्रतिनिधी)
मुंडे यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका - दानवे
गोपीनाथराव मुंडे हे मोठे नेते होते़ मुंडे यांनी केलेल्या आंदोलनात मी त्यांच्यासोबत होतो़ दोघांनाही मंत्रीपद मिळल्यानंतर २ जुनच्या रात्री ११.३० आकरा पर्यंत सोबत होतो. त्यावेळी देशातील साखर निर्यात बंदी कायद्यासंदर्भात कामे करण्यासाठी चर्चा केली होती. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोरका झाला आहे.
मुंडे यांना मुख्यमंत्री म्हणून पहायचे होते- फडणवीस
गोपीनाथ मुंडे यांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला मुंडे यांना पहायचे होते. परंतु हे नियतीला मान्य नव्हते, मुंडे साहेबांना दिल्लीने परत केले नाही. त्यांनी उपेक्षितांना न्याय दिला. उपमुख्यमंत्री असताना त्यांनी संघटित गुन्हेगारी मोडीत काढली. मुंडे यांच्यासारखा संसदपटू पाहिला नाही.ज्यावेळी बोलण्यास उठायचे तेव्हा अख्खे सभागृह शांत व्हायचे. केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील कामे करण्यासंदर्भाचा त्यांनी आरखडा तयार केला होता़ त्यांच्यासारखा नेता होणे नाही असेही ते म्हणाले़
मोठ्या मनाचा राजकारणी
गोपीनाथ मुंडे यांचे जीवन म्हणजे एक संघर्ष यात्रा होता. जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास त्यांनी घेतला होता. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाबाबत त्यांनी माझ्याशी चर्चा केली होती. अनेक विकासात्मक योजना त्यांनी बीड जिल्ह्यासाठी आखल्या होत्या. याविषयी माझ्याशी त्यांचे बोलणे झाले होते, असे खा. रजनी पाटील यांनी यावेळी सांगितले.
मतभेद होते; मनभेद नाही
अनेक अपघातातून गोपीनाथ मुंडे वाचले होते, याही अपघातातून सुखरुप बाहेर पडतील, असं वाटल होतं पण नियती किती कठोर आहे याचा अनुभव आला. गोपीनाथ मुंडे व आमच्यात अतूट मैत्री होती. मतभेद होते, पण मनभेद कधीच झाले नाहीत. मुंडे यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेत्याकडून अनेकांनी आदर्श घ्यावा, असे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भाषणात सांगितले.

Web Title: Memories came from the throat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.