बीडसांगवीच्या ग्रा.पं. सदस्याचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:13 IST2017-11-16T00:12:54+5:302017-11-16T00:13:18+5:30
कडा : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेले पोपट लक्ष्मण बेरड याला ‘चहा प्यायला चल थोडंस बोलायचे’ ...

बीडसांगवीच्या ग्रा.पं. सदस्याचे अपहरण
कडा : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेले पोपट लक्ष्मण बेरड याला ‘चहा प्यायला चल थोडंस बोलायचे’ असे म्हणत बीड नगर राज्य महामार्गावरून आष्टी येथून चारचाकी गाडीत बळजबरीने बसवून अपहरण केल्याची घटना मंगळवारी घडली.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून पोपट बेरड निवडून आले होते. पुढील महिन्यात उपसरपंच पदाच्या निवडी होणार असल्याने पोपट बेरड उपसरपंच पदाचे दावेदार होते. मंगळवारी बेरड हे मुलीला सोडवण्यासाठी आष्टी येथील भगवान विद्यालयाच्या गेटवर आले असता, चहा घेऊ, तुला थोडं बोलायचे आहे, असे म्हणून आरोपी अमोल कारंडे याने दुचाकीवरून थोडे पुढे नेले.
कारण त्याच्या उपसरपंच होण्यात बेरडचा अडसर होता. यावेळी पाठीमागून आलेल्या जीपमधील हरिदास दिगंबर शिंदे रा. वाळुंज, दिपक हौसराव सावंत, अमोल पंडित कारंडे (रा.बीड सांगवी) व अन्य एकाने त्यांना बळजबरीने पुण्याकडे नेले. हा प्रकार बेरड याच्या नातेवाईकांनी पाहिला. पोलिसांना माहिती देऊन सदरील जीप शिक्रापूर येथे पकडली. त्यानंतर गुन्हा दाखल करून तिघांनाही ताब्यात घेतले आहे. एक आरोपी फरार आहे.